29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकची पाणी कपात टळली

नाशिकची पाणी कपात टळली

टीम लय भारी

नाशिक: नाशिकमध्ये पाणी कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. मागच्या आठवडयात नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आता पाणी कपात टळली आहे. नाशिकच्या पाण्याचे मोजमाप दुतोंडया मारुती वरुन केले जाते. आज दुतोंडया मारुतीच्या कमरेला पाणी लागले. त्यामुळे हे पाणी वाढले की, पुर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाकडून नागरीकांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकच्या गंगापूर धरणातून दीड हजार क्यसेक्स पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले.

नाशिकच्या इगतपूरी तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बरसात सुरु आहे. घोटी, इगतपूरी, वैतरणा, खेड, टाकेद, नांदगावमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, दुबार पेरणीचे संकट टळले आहे. त्यामुळे बळीराजा आनंदाला आहे.

हे सुध्दा वाचा:

महाराष्ट्रातला ‘पेचप्रसंग’ कधी संपणार ?

‘उद्धव साहब हम आपके साथ है’ चिमुकलीने दिला धीर

चालकाचे नियंत्रण सुटल्याने तलावात कोसळली कार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी