30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू, यावर कसा तोडगा निघणार?

महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू, यावर कसा तोडगा निघणार?

टीम लय भारी

नाशिक : नाशिक येथील त्र्यंबक तालुक्यातील शेंद्री पाडा येथे पुल नसल्यामुळे महिलांची समस्या लक्षात घेत आदित्य ठाकरे यांच्या सहकार्यातून लोखंडी पूल बांधण्यात आला होता, परंतु पुराच्या पाण्यामुळे चक्क पुलच वाहून गेल्यामुळे पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून महिलांना पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन कसरत करावी लागत आहे. याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

लाकडी बल्ल्यांवरून डोक्यावर हंडा घेऊन जाणाऱ्या महिलांचे धक्कादायक वास्तव काही महिन्यांपूर्वी माध्यमांनी पुढे आणले होते, त्यावर प्रतिसाद देताना आदित्य ठाकरे यांनी मदतीचा हात पुढे करीत शेंद्री पाडा येथे लाकडी बल्ले काढून त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधला. काही दिवसांनी आदित्य ठाकरे हे स्वतः या पुलाच्या उद्घाटनासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेले होते.

दरम्यान, मागील दहा दिवसांत नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पावसाच्या धुवाधार कोसळण्याने पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला. पुल वाहून गेल्यामुळे पाण्यासाठीची महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू झाली असून याबाबतचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेची घडी पुर्णपणे विस्कटली. शिवसेनेला पुन्हा उभं करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने ठाकरे पुन्हा नाशिकला भेट देणार का, वाहून गेलेल्या सदर पुलाबाबत काही पावलं उचलणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आज निकाल, कोणत्या उमेदवाराला मिळणार पद?

MPSC मार्फत शिक्षक भरती घेण्याचा शिक्षण आयुक्तालयाने शासनाला दिला प्रस्ताव

बाळासाहेबांच्या नावाची निलेश राणेंना चिंता? उद्धव ठाकरेंना सुनावले खडे बोल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी