29 C
Mumbai
Friday, November 17, 2023
घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने मांडला युक्तिवाद; काय आहेत युक्तिवादाचे मुद्दे?

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने मांडला युक्तिवाद; काय आहेत युक्तिवादाचे मुद्दे?

राज्यातील राजकारण हे वेगळ्याच वळणावर गेलेलं दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे केलं तेच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. काही महिन्यांपूर्वी देखील शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यात निवडणूक आयोगाने पक्ष, चिन्ह आणि पक्षावरील हक्क याबबात घोषणा केली. यावेळी हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. हीच परिस्थिति शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात पहायला मिळत आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. यासाठी आता न्यायालयात दोन्ही गटाकडून आपापला युक्तिवाद मांडला तर शरद पवार गटाने न्यायालायाचा निर्णय मिळेपर्यंत चिन्ह न गोठवता चिन्ह हे आपल्याकडे ठेवण्याची मागणी शरद पवार गटाने न्यायालयाकडे केली आहे.

पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षप्रमुख हे शरद पवारच आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाने पक्षाचे मुख्य हे अजित पवार असल्याचं बोललं गेलं आहे. तर शिवसेना पक्षाच्या निर्णयाचा प्रतिज्ञापत्रात दाखला अजित पवार गटाने दिला आहे. अशावेळी अजित पवार गटाने शरद पवार हे स्वतःच्या म्हणण्यानुसार पक्ष चालवतात, असा युक्तिवाद केला आहे. सध्या सुरू असलेली सुनावणी ही संपूर्ण कायदेशीर असल्याचं निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. तर दोन्ही गटाने आपापला युक्तिवाद मांडला आहे.

अजित पवार गटाचा युक्तिवाद

विधिमंडळाचे संख्याबळ हे अधिक अजित पवार गटाकडे.

जयंत पटलांची झालेली प्रदेशाध्यक्ष पदाची नियुक्ती बेकायदेशीर आहे.

55 आमदार आणि 2 खासदारांचा आम्हाला पाठिंबा.

महाराष्ट्र आणि नागालँडचे आमदार हे आमच्या बाजूने आहेत.

पक्षाचा दर्जा निघून गेला आहे.

मुख्य प्रतोद आमच्या बाजूने असल्याने 9 आमदारांवरील करवाईचं पत्र बेकायदेशीर. हे युक्तिवाद अजित पवार गटाने मांडले आहेत.

हे ही वाचा 

मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या गाड्यांसाठी विधानभवनात भेदभाव !

श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंचे पितळ पाडले उघडे !

विधान परिषद गाठणार शंभरी! आजी माजी सदस्यांसाठी होणार खास कार्यक्रम

शरद पवार गटाचा युक्तिवाद

अजित पवार गटाची भूमिका ही पक्षाच्या विरोधात आहे.

अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करण्यासाठी अध्यक्षांकडे पत्र दिलं.

पक्ष चालवताना पक्षानुसार नियुक्त्या व्हाव्यात. अजित पवारांनी पक्षाची भूमिका पाळली नाही.

24 पैकी 22 राज्याचे प्रदेशाध्यक्ष हे आमच्या बाजूने.

एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला. हा मूळ पक्ष आमचाच आहे.

आमदार सोडून गेले असले तरीही पक्षावरच दावा आमचाच.

राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही.

असे काही युक्तिवाद हे शरद पवार गटाने मांडले आहेत. तर पुढील सुनावणी ही येत्या सोमवारी 9 ऑक्टोम्बर रोजी पुन्हा एकदा होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी