राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कुलस्वामिनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. मंदिरात आकर्षक रोषणाई, भव्यदिवे, घटस्थापनेची लगबग दिसून आली. सलग नऊ दिवस अंबाबाई मंदिरात लाखोंच्या संख्येने देवी भक्तांची मोठी रांग लागते. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. अंबाबाई मंदिरात देशभरातून देवी भक्त येतात, वाहनताळाची सुविधाही वाढवण्यात आली आहे.
अंबाबाई मंदिरात घटस्थापनेचा विधी पूर्ण झाल्यानंतर तोपेशी सलामी देण्याची प्रथा आहे. तोफेची सलामी दिल्यानंतरच घटस्थापना झाल्याचा संदेश ग्राह्य धरला जातो. या दिवसात नऊ दिवस देवीची वाहन पूजा बांधतात. रविवारी सकाळी नऊ वाजता मंदिरात तोफेची सलामी देण्यात आली.
Ambabai Temple (also known as Mahalaxmi Mandir) is an important Hindu temple dedicated to Goddess Lakshmi, who resides here as Supreme Mother Mahalakshmi and is worshipped by locals as Ambabai. pic.twitter.com/IcLKuFxSUv
— Daya Akanurkar (@DayaAkanurkar11) October 15, 2023
नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रूपाची अंबाबाई मंदिरात पूजा केली जाईल. रविवारी प्रतिपदेला पारंपारिक बैठी पूजा झाल्यानंतर सोमवारी द्वितीयेला महागौरी पूजा केली जाईल. मंगळवारी तृतीयेला कामाक्षी देवी पूजा, बुधवारी श्री कुष्मांडा देवी पूजा, गुरुवारी पारंपारिक गजानन पूजा, षष्ठीला श्री मोहिनी अवतार पूजा, शनिवारी श्री नारायणी नमोस्तुते पूजा, अष्टमीला पारंपारिक महिषासुरमर्दिनी पूजा आणि सोमवारी दक्षिणामूर्ती रुक्मिणी पूजा होणार आहे.
नवरात्रीत अष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व असते. अंबाबाई मंदिरातही अष्टमी दणक्यात साजरी केली जाते. अष्टमीला मंदिराभोवती रांगोळ्यांनी रस्ते सजवले जातील. देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवून आकर्षक शहरभर प्रदक्षिणा पूर्ण केली जाईल. ही पालखी कोल्हापूरच्या दसरा चौकात विजया दशमीच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी पोहोचेल. राजर्षी शाहू महाराज घराण्याची संबंधित करण्याचे वारस पारंपरिक वेशभूषेत देवीची पूजा करतील. त्यानंतरच सिम्मोलंघन केले जाईल. कोल्हापुरातील दसरा उत्सवाचे देशरात आकर्षण आहे. हा पारंपारिक सोहळा पाहण्यासाठी बघ्याची तोबा गर्दी असते.
हे ही वाचा
दांडिया आयोजकांना घ्यावी लागणार लोकांच्या आरोग्याची काळजी
नवरात्रीच्या घागरा चोळीची खरेदी करायचीये? ही आहेत मुंबईतील ७ प्रसिद्ध ठिकाणे
नवरात्रीच्या खरेदीसाठी बाजारात लगबग वाढली
अंबाबाई मंदिराचा इतिहास
इसवी सन ६२४ साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी अंबाबाई मंदिराची स्थापना केली. या मंदिरावर मुघलांनी हल्ला केला होता. देवीच्या मूर्तीचा विध्वंस होऊ नये म्हणून मंदिरातील पुजाऱ्याने मूर्ती अनेक वर्ष लपवून ठेवली होती अशी आख्यायिका आहे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन १७१५ ते १७२२ या काळात मंदिराची पुनर्बांधणी केली. दगडात कोरलेल्या देवीच्या मूर्तीचे वजन जवळपास ४० किलो आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा, नवरात्र उत्सव हे राज्यातील मंदिर प्रथांचे उत्तम उदाहरण समजले जाते.