33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रNavratri 2022 : एकनाथ शिंदे दर्शन घेत नाहीत तोपर्यंत देवीचे विसर्जन नाही,...

Navratri 2022 : एकनाथ शिंदे दर्शन घेत नाहीत तोपर्यंत देवीचे विसर्जन नाही, मंडळाचा अजब हट्ट

देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नाहीत म्हणून ठाण्यातील एका मंडळाने देवीचे विसर्जन केलेच नाही. एकनाथ शिंदे जोपर्यंत देवीच्या दर्शनासाठी येत नाहीत तोपर्यंत देवीचे विसर्जनच करणार नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदाच्या वर्षी मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सवाचा सण साजरा करण्यात आला. नऊ दिवस देवीची मनोभावे पुजा करून काल दसऱ्याच्या दिवशी देवीचे विसर्जन करण्यात आले, परंतु याच पार्श्वभूमीवर एका मंडळाने देवीचे अद्याप विसर्जनच केले नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे सगळीकडे या मंडळाची खमंग चर्चा सुरू झाली आहे. आमंत्रण देऊन सुद्धा देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नाहीत म्हणून ठाण्यातील एका मंडळाने देवीचे विसर्जन केलेच नाही. एकनाथ शिंदे जोपर्यंत देवीच्या दर्शनासाठी येत नाहीत तोपर्यंत देवीचे विसर्जनच करणार नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कळवा येथील विटावा परिसरातील सूर्यनगर भागातील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टकडून यंदा सुद्धा जल्लोषात देवीचे स्वागत करण्यात आले. नित्यनियमाने देवीची नऊ दिवस मनोभावी पुजा करून हा उत्सव या मंडळाकडून यथोचित साजरा करण्यात आली, यावेळी सर्वसामान्यांसाठी सहज भेटीगाठी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या देवीच्या दर्शनाला यावे असे मंडळाला वाटत असल्याने त्यांनी त्याबाबतचे आमंत्रण सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले, परंतु राज्याचा प्रचंड पसारा सांभाळण्यात मुख्यमंत्री शिंदे व्यस्थ होते शिवाय दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीने सुद्धा त्यांनी उसंत मिळाली नाही.

हे सुद्धा वाचा…

Job Updates : ‘नॅशनल इंस्टिट्यूट’मध्ये मेगा भरती, पगार ऐकाल तर अचंबित व्हाल

Mumbai News : मुंबई विद्यापीठात दारुच्या बाटल्यांचा खच, शिंदे गटाकडून विद्यापीठाला आहेर

Mukesh Ambani : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या व्यक्तिला बिहारमधून अटक

कारण कोणतेही असले तरीही एकनाथ शिंदे यांना नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टच्या देवीच्या दर्शनाला जाणे शक्य झाले नाही, त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. या नाराजीमुळे त्यांनी दसऱ्याचा सण संपला तरीही अजूनही देवीचे विसर्जन केलेले नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येऊन देवीचे दर्शन घेत नाहीत तोपर्यंत देवीचे विसर्जन न करण्याचा हट्टच या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे आता तरी एकनाथ शिंदे यांचे लक्ष या मंडळाकडे जाईल का आणि देवीचे दर्शन घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकांना सर्वसामान्यांचे कैवारी वाटतात. त्यांच्या साध्या, आपलेपणाच्या स्वभावामुळे सर्वसामान्यांना ते लगेचच आपलेसे वाटतात, शिवाय त्यांच्यातील एक होऊन त्यांना ऐकून घेण्याची शैली मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असल्यामुळे अनेकजण सहजपणे त्यांना आपल्यातील एक मानतात, मात्र आता हीच गोष्ट मुख्यमंत्र्यांना आता भारी पडतेय का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी