34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. विजय चोरमारे लिखीत नव्या पुस्तकाचे आज प्रकाशन !

डॉ. विजय चोरमारे लिखीत नव्या पुस्तकाचे आज प्रकाशन !

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे लिखित 'संभ्रमित काळाच्या नोंदी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (7 मार्च) रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे लिखित ‘संभ्रमित काळाच्या नोंदी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (7 मार्च) रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. डॉ. विजय चरमारे हे ज्येष्ठ पत्रकार आणि नामांकित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी यााधीही अनेक पुस्तकांचे लेखन तसेच संपादन केलेले आहे. सध्या ते आणखी एक नव्या विषयाला घेऊन वाचकांसमोर येत आहेत. विशेष म्हणजे यावेळी विजय चोरमारे यांनी लिहिलेल्या ‘संभ्रमित काळाच्या नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर व ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ग्रंथाली प्रकाशनाच्या मदतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘संभ्रमित काळाच्या नोंदी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात अभिनेता शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याजवळ असणाऱ्या आयडेंटीटी बिल्डिंग ग्रंथाली-प्रतिभांगण याठिकाणी सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे. याठिकाणी अनेक ज्येष्ठ पत्रकारांसह इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. विजय चोरमारे हे पुन्हा एकदा एका नव्या विषयावर आधारित पुस्तक घेऊन वाचकांच्या समोर आले असल्याने अनेकांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. शिवाय अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी चोरमारे यांच्या या नव्या पुस्तकासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहे.

हे सुद्धा वाचा

साताऱ्यात भाजप-शिंदेगट आमने सामने! शंभुराज देसाई अन् उदयनराजेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

सरकारच्या निषेधार्थ बळीराजाने केली कांद्याची होळी..!

चौथ्या कसोटी सामन्यात भारत मोडणार ऑस्ट्रेलियाचा विक्रम; वाचा काय आहे विशेष संधी

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. या ग्रंथाचे एकुण 5 खंड प्रकाशित होणार आहेत. त्यापैकी पहिल्या भागाचे प्रकाशन नुकत्याच एका कार्यक्रमात झाले. या पुस्तकातून पवारांची राजकीय कारकीर्द व त्यांच्या जीवनप्रवाहाचा आढावा घेण्यात आलेला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशनकरण्यात आले होते. या पुस्तकाचे संपादन सुद्धा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनीच केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी