28 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरमहाराष्ट्रNitesh Rane : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत लक्षात ठेवा, नितेश राणेंचा...

Nitesh Rane : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत लक्षात ठेवा, नितेश राणेंचा हल्लाबोल

कोल्हापुरात दोन मुली गायब झाल्यानंतर लव्ह जिहाद घडल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत असताना सदर प्रकरण सांभाळण्यास आताचे कडवट हिंदुत्ववादी सरकार सक्षम असल्याचे म्हणत आता राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत असा मिश्किल टोला लगावत नितेश राणेंनी ठाकरे सरकारच्या अक्षमतेची खिल्ली उडवली आहे.

राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप – प्रत्यारोपांची खेळी वेगवेगळ्या कारणांनी आणखीच रंगू लागली आहे. यावेळी भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करीत आताच्या सरकारवर स्तुती सुमने उधळली आहेत. कोल्हापुरात दोन मुली गायब झाल्यानंतर लव्ह जिहाद घडल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत असताना सदर प्रकरण सांभाळण्यास आताचे कडवट हिंदुत्ववादी सरकार सक्षम असल्याचे म्हणत आता राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत असा मिश्किल टोला लगावत नितेश राणेंनी ठाकरे सरकारच्या अक्षमतेची खिल्ली उडवली आहे. यावेळी या प्रकरणात पळवून नेलेल्या मुली दोन दिवसांत घरी आल्या नाहीत तर कोल्हापूरमध्ये तांडव करू असा सज्जड दम सुद्धा त्यांनी दिला आहे.

कोल्हापूर प्रकरणी नितेश राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेचा आढावा घेत आधीच्या मविआ सरकारवर टीका करीत आताचे सरकार पीडीतांना न्याय देण्यास समर्थ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अवघ्या १५ दिवसांपूर्वीच एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. मुलीच्या अचानक बेपत्ता होण्यामागे लव जिहाद असल्याचा संशय व्यक्त करत हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने या कृत्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस या प्रकरणी योग्य तपास करत नसल्याचा आरोपच पीडीतेचे पालक आणि हिंदुत्ववादी संघटनेने केला.

या प्रकरणाची तात्काळ नोंद घेत निलेश राणे यांनी कोल्हापुरात जाऊन तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत आणि दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री नाही हे लक्षात ठेवा. आता सरकार बदललेलं असून राज्यात भाजपचं सरकार आहे. १७ ऑक्टोबराला मुलगी हरवल्याची फिर्याद दिल्यानंतरही तपास होत नाही. फोन केल्यानंतर पोक्सो कलम लावले जाते. अजूनही मुलगी घरी आलेली नाही. तुम्ही काय करता, जमत नसेल तर वर्दी सोडून द्या अशा शब्दात राणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

याआधी या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्यावेळी त्यांनी घोषणाबाजी करीत माजी मंत्री हसन मुश्रीफ, नवाब मलिक यांच्यावर सडकून टीका केली. याप्रसंगी भाजपच्या पदाधिकार्‍यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणी भाजपनेते नितेश राणे यांनी सुद्धा गांभीर्याने लक्ष देत या प्रकरणाच्या तळाशी जाऊन तपास करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना देत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी यावेली खरडपट्टीच काढली आहे.

हे सुद्धा वाचा…

Shah Rukh Khan Birthday : पडद्यावरच नाही तर रिअर लाईफ मध्ये सुद्धा ‘बादशहा’च!

Bacchu Kadu : आमदार बच्चु कडूंची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न सुरूच; मतदार संघाला 500 कोटींचा निधी देणार

Anandacha Shidha : आनंदाचा शिधा न मिळाल्याने ग्राहकांचा रेशन दुकानावर हल्ला

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, हिंदूंवर असा अन्याय होत असेल तर चुलीत जाऊ दे ती आमदारकी आणि डब्यात जाऊ दे खासदारकी अशा तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. राणे पुढे म्हणाले, हिंदू-मुस्लिमांना जिहादी मुसलमान तरुण मुद्दाम प्रेम संबंधात फसवत विवाह करतात आणि नंतर धर्मांतर करून घेतात. गेल्या काही वर्षात अनेक मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्या अजून सापडल्या नाहीत. हे प्रकार त्वरित बंद झाले पाहिजे आणि पोलिसांनी योग्य कारवाई केल्याशिवाय हे थांबणार नाही, म्हणत पोलिसांना त्वरित कारवाई करा अन्यथा पुढे काही घडलं तर आम्ही जबाबदार नाही असे म्हणून त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य यावेळी सांगितले.

हिंदू मुलींना फसवण्यासाठी पैसे आणि ताकद दिली जाते. या सगळ्या घटनांचे रेटकार्ड तयार झाले आहेत. या प्रकरणी मी विधानसभेतही बोललो असून मुस्लिम धर्मातील विचारवंतांना आवाहन करतो की अशा पद्धतीच्या तरुणांना समजवून सांगा, राज्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत. ज्या-ज्या मुलींची तक्रार असेल त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. कोणत्याही पोलिसांना घाबरण्याची गरज नाही. गृहमंत्री म्हणून कडवट हिंदुत्ववादी देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत, असा शाब्दिक हल्ला चढवत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा फटकारले आहे.

नितेश राणे म्हणतात, जर पोलिसांना नीट काम करता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात असे म्हणून त्यांनी पोलिसांच्या दुर्लक्षिततेवर आक्षेप नोंदवला. केवळ इतक्यावरच न थांबता पळवून नेलेली मुलगी तात्काळ आली नाही तर कोल्हापुरात तांडव होईल असा थेट इशाराच देत नितेश राणे यांनी पोलिसांना चांगलेच सुनावले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!