28 C
Mumbai
Thursday, August 11, 2022
घरमहाराष्ट्रजाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! महाराष्ट्र भाजपचे जाहीर आवाहन

जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! महाराष्ट्र भाजपचे जाहीर आवाहन

टीम लय भारी

उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजर करण्यासाठी कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यंदा महाराष्ट्र भाजपकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव  नको म्हणत जाहीर आवाहन केले आहे.

यंदा देवेंद फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डींग बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून, टिव्हीच्या माध्यमातून जाहीरात प्रसिद्ध करणार नाहीत असे भारतीय जनता पक्षातर्फे भाजप कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.

सदर माहिती प्रसिद्धीपत्रकात प्रसिद्ध करून सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. यामध्ये महाराष्ट्र भाजप पुढे म्हणाले, होर्डींग बॅनर, जाहिराती असे कोणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल, त्यामुळे या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

ज्या कोणाला योगदान द्यायचे आहे, त्यांना विविध सेवाकार्यात योगदान द्यावे असे आवाहन सुद्धा पत्रकातून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

शिंदे गटाची क्रेझ वाढली! कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचा लवकरच शिवसेनेला रामराम?

इंदौरहुन पुण्याला येणारी ‘महाराष्ट्र राज्य परिवहन’ची बस नर्मदा नदीमध्ये कोसळली; बसमध्ये 55 प्रवासी होते

‘काय त्या स्टोऱ्या, काय त्या फोकनाड्या, काय ती गरीबी, एकदमच वोक्केमंदी!’ शिंदेगटाविरोधात नरकेंचा हल्लाबोल

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!