विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडी,टीडीएफ आणि शिक्षक सेना तसेच समविचारी संघटना पुरस्कृत उमेदवार संदीप गुळवे (Sandeep Gopalrao Gulve) यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार मविप्र सारचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे व शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या शिक्षक मेळाव्यात घेण्यात आला.(A strong mechanism to elect Sandeep Gopalrao Gulve was decided to create a strong machinery to get him elected.)
शिक्षक मतदार संघासाठी अॅड.संदीप गोपाळराव गुळवे (Sandeep Gopalrao Gulve) यांनी नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरल्यानंतर नाशिकरोड येथील निसर्ग लॉन्स येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गिते, निर्मलाताई गावित,माजी महापौर विनायक पांडे,इंदिरा काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील, मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे,प्राचार्य रवींद्र मोरे,सचिन मराठे,सचिन बांडे,शरद पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार,शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, शिवसेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, महेश बडवे,देवानंद बिरारी आदी होते.
संदीप गुळवे (Sandeep Gopalrao Gulve) हे धडाडीचे कार्यकर्ते व नेते आहे.मविप्र तसेच अन्य संस्थांमध्ये ते कार्यरत असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण आहे. विधान परिषदेवर ते निवडून गेल्यास शिक्षकांचे प्रश्न ते हिरीरीने मांडतील व त्यांना न्याय मिळवून देतील,असा विश्वास ॲड.नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांच्या मागे जिल्ह्यातील शिक्षकांची संपूर्ण फळी उभी करू, असेही ठाकरे पुढे म्हणाले.संदीप गुळवे यांच्यातील नेतृत्व गुण आणि कोणतेही प्रश्न तातडीने धसास लावण्याची त्यांची कला हे गुण हेरूनच मा. उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शिक्षक संघटनांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तन-मन-धनाने काम करतील,असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला. संदीप गुळवे यांच्यामागे राष्ट्रवादी शरद पवार गटाची संपूर्ण ताकद उभी करण्याची ग्वाही या पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी दिली.नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी संदीप गुळवे यांना नाशिक विभागातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे अभिवचन दिले.मला उमेदवारी करण्याची संधी देऊन उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला मी कदापि तडा जाऊ देणार नाही.निवडून आल्यानंतर शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू,असे संदीप गुळवे (Sandeep Gopalrao Gulve) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे,शरद पाटील आदींचीही यावेळी भाषणे झाली महाविकास आघाडी,टीडीएफ, शिक्षकसेना आणि अन्य संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी व शिक्षक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.