28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशकात प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशकात प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन

मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केला आहे.इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या पाठ्यक्रम शालेय शिक्षण विभागाकडून तयार केलेला असून यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमात केल्याने पुन्हा एकदा चातुवर्ण्य, अंधश्रद्धा याला खतपाणी घालण्याचे व समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत होत आहे. याला विरोध करण्यासाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन केले.

मनुस्मृतीच्या (Manusmriti ) श्लोकांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केला आहे.इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या पाठ्यक्रम शालेय शिक्षण विभागाकडून तयार केलेला असून यामध्ये मनुस्मृतीच्या (Manusmriti ) श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमात केल्याने पुन्हा एकदा चातुवर्ण्य, अंधश्रद्धा याला खतपाणी घालण्याचे व समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत होत आहे. याला विरोध करण्यासाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचे (Manusmriti ) दहन केले. (All India Mahatma Phule Samata Parishad burns symbolic Manusmriti in Nashik)

चातुवर्ण्य व अंधशश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश कुणालाही मान्य नसून कदापिही त्याचा समावेश केला जाता कामा नये अशी भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने घोषणाबाजी करत शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे फलक झळकवत महापुरुषांचे विचार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे मनुस्मृतीचे नव्हे असे आवाहन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे फलक झळकवत महापुरुषांचे विचार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे मनुस्मृतीचे नव्हे असे आवाहन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा पुजा आहेर, महिला शहराध्यक्षा आशाताई भंदुरे, जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, नाना पवार, अमोल नाईक, श्रीराम मंडळ, संतोष भुजबळ, किशोर गरड, जयेश सैंदाणे, हरीष महाजन, रामा गायकवाड, अजय बागुल, सुरेश शिंदे, सचिन जगझाप, धनंजय थोरात, नाना साबळे, सागर मरवट, विलास वाघ, किरण भावसार, गोरख चहाळ, जिभाऊ आहीरे, माहेन तांबे, भारत जाधव, विशाल तांबे, मच्छिंद्र माळी, शरद मंडलिक, समाधान तिवडे, बबन जगताप, पोपटराव जेजुरकर, नाना शिंदे, विकी शिंदे, नितीन चंद्रमोरे, प्रकाश महाजन, मुकेश झनके, अमित भोसले, जुनेद शेख, संगिता हांडगे, वैशाली भांगरे, गिता पवार, मंगला मोकळ, सुनिता जाधव, रंजना कुंदे, संगिता जाधव, अनिता पवार, निर्मला सावंत, माधुरी एखंडे, रंजना गांगुर्ड, रुपाली पठारे, सुजाता खैरनार, निशा झनके, संगिता विचारे, वंदना आहीरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी