30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रJayant Patil : चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे -...

Jayant Patil : चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. भाजप हे सर्व जाणीवपूर्वक करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर चौकशा लावून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. भाजप हे सर्व जाणीवपूर्वक करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर चौकशा लावून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या या दबावाला आपण कडाडून विरोध करु आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना दिला. जयंत पाटील आज जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याचे आव्हान केले. तुम्ही लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या. क्रियाशील कार्यकर्ते आपल्या भागात तयार करा. आपासामधील वाद बंद करा. आपली संघटना मजबूत करा असे देखील जयंत पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँगेस पक्षाने महाविकास आघाडी सरकार असतांना परिसंवाद यात्रा काढली होती. पवार साहेबांना मानणारा एक वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यामुळे पक्ष वाढविण्यासाठी प्रमाण‍िक प्रयत्न करायला हवे. आता बुथ कमिटया पूर्ण करा. पक्ष संघटना सक्षम करा. आपल्या पक्षाची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करायला हवे. मागच्या निवडणुकीमध्ये आपली लढत ही थेट शिवसेनशी होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या सोबत युती केली. महाव‍िकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र आडीच वर्षानंतर शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली आणि सरकार कोसळले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

हे सुद्धा वाचा

जाणून घ्या ! कसे आहे आज सुरु होणाऱ्या ‘आशिया चषक 2022­­­­’ चे स्वरूप

अष्टविनायक दर्शन : थेऊरचा ‘चिंतामणी’

Devendra Fadnavis : संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी- देवेंद्र फडणवीस

अशा प्रकारे बंडखोरी केलेले नेते जनतेला आवडत नाही. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून येण्यास मोठी संधी आहे. सुप्र‍िम कोर्टाचा निकाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्यास काही महिन्यातच निवडणूका लागण्याची शक्यात आहे. त्यामुळे आपण संघटनात्मक बांधणी केली पाहिजे. आपले घडयाळ घराघरात पोहोचले पाहिजे असे सांगत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आव्हान केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी