चार दिवसापासून नाशिक रोड, शहर, ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा ( power issue) खंडीत होत असल्याने नागरिक व व्यावसायिकांचे हाल होत आहेत. शेतक-यांचे नुकसान होत आहे. महावितरणने वीज पुरवठा ( power issue) तातडीने सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता डोंगरे यांना निवेदन दिले. वीज पुरवठा ( power issue) लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.(Army threatens to protest over power issue)
निवेदनाचा आशय असा – एकलहरे येथे ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तो दिवसात दोन-दोन तास सुरु ठेवण्याचे आश्वासन महावितरणने दिले होते. त्याचे नियोजन योग्य पध्दतीने केले जात नाही. त्यामुळे नागरीकांचे मोठे हाल होत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे कठीण होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युध्दपातळीवर केल्यास पिकांना वेळेवर पाणी देता येईल.
यावेळी माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक भारती ताजनपुरे, कन्नू ताजणे, उत्तम कोठुळे, किरण डहाळे, अंबादास ताजनपुरे, सागर भोर, रमेश पांळदे, प्रशांत दिवे, योगेश देशमुख, अशोक जाधव, योगेश गाडेकर, सागर निकाळे, मिलिंद मोरे,शिवा गाडे, राजू मोरे, विजय भालेराव, अनिल गायखे, मंगेश पोरजे, कुलदीप जाधव, अंबादास ताजनपुरे, किशोर कानडे, संजय गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.