भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आव्हान करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे वतीने अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाचा असे पुढील प्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाड येथील क्रांतीचे ठिकाण असलेल्या चवदार तळयावर महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला.(BJP Scheduled Caste Morcha demands registration of fir against Jitendra Awhad)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे भाजप भलतंच आक्रमक झाला असून त्यांनी निषेध करत हा मुद्दा जोरदार लावून धरला आहे. भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटही आव्हाडांविरोधात असून गुरूवार सकाळपासूनच राज्यभरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे एकंदर वातावरण खूपच तापलेलं दिसत आहे. आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून काही ठिकाणी आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात राज्यातील वातावरण खूपच तापलं असून भाजपने तर आव्हांडाविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. भाजप नेते, कार्यकर्ते यांच्याकडून राज्यातील विविध शहरांत आव्हाडांविरोधात (Jitendra Awhad) आंदोलन करण्यात येत आहे, निषेधाच्या घोषणाही देण्यात येत आहेत.
या कृत्याने समस्थ अनुसूचित जातीच्या बांधवांचे भावना दुखावल्या असून या कृत्याचा भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा, नाशिक महानगराच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांचे विरुध्द अट्रॉसिटी कायदया अंतर्गत (दलित अत्याचार प्रतिबंधक कायदया अंतर्गत) गुन्हा दाखल करून त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी हि विनंती अंबड पोलीसाना राकेश दोंदे, अध्यक्ष, अनुसुचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगर यांच्या वतीने करण्यात आली.