26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपावसाळ्यापूर्वी कामे वेगाने पूर्ण करा शहरातील पाणी पुरवढा सुधारणा करा -आ. देवयानी...

पावसाळ्यापूर्वी कामे वेगाने पूर्ण करा शहरातील पाणी पुरवढा सुधारणा करा -आ. देवयानी फरांदे.

नाशिक महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्व करण्यात येणाऱ्या कामाबाबत आमदार प्रा.देवयानी फरांदे यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांची शिष्ट मंडळासह भेट घेतली.यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक महानगरपालिकेकडून पावसाळापूर्व करण्यात येणाऱ्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना पावसाळा अत्यंत जवळ आलेले असून काही प्रमाणात पाऊस सुरू देखील झालेला आहे. परंतु नाशिक शहरातील पावसाळापूर्व कामे अजून प्रलंबित आहेत. नालेसफाई करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असून यामुळे जोरात पाऊस आल्यास नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. नाशिक शहरातील झोपडपट्ट्यांमधील नालेसफाई करणे गरजेचे आहे.शासनाकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यास पाणीपुरवठा वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

नाशिक महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्व करण्यात येणाऱ्या कामाबाबत आमदार प्रा.देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांची शिष्ट मंडळासह भेट घेतली.यावेळी आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande)यांनी नाशिक महानगरपालिकेकडून पावसाळापूर्व करण्यात येणाऱ्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना पावसाळा अत्यंत जवळ आलेले असून काही प्रमाणात पाऊस सुरू देखील झालेला आहे. परंतु नाशिक शहरातील पावसाळापूर्व कामे अजून प्रलंबित आहेत. नालेसफाई करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असून यामुळे जोरात पाऊस आल्यास नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. नाशिक शहरातील झोपडपट्ट्यांमधील नालेसफाई करणे गरजेचे आहे.शासनाकडून पुरेसा पाणीपुरवठा (water supply) होत नसल्यास पाणीपुरवठा (water supply) वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी सांगितले.(Complete works expeditiously before monsoon Improve water supply in the city — Devyani Farande.)

जुने नाशिक भागातील दहिफुल व सराफ बाजार परिसरात पहिल्या पावसात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणी नालेसफाई करून पावसाचे पाणी नागरिकांच्या दुकानात जाणार नाही यासाठी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी नालेसफाईची कामे व पावसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात नाशिक महानगरपालिकेकडून अघोषित पाणीटंचाई सुरू असून पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा करण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे.याबाबत नाराजी व्यक्त करतानाच शासनाकडून पुरेसा पाणीपुरवठा (water supply) होत नसल्यास पाणीपुरवठा (water supply) वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असणारे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी शासनाकडून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत असून नागरिकांना योग्य दाबाने व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर शहर अभियंता संजय अग्रवाल उपायुक्त नितीन नेर,उद्यान अधीक्षक विवेक भदाणे,मिळकत व्यवस्थापक राऊत, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.तसेच नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बापू सोनवणे, चंद्रकांत खोडे,सुनील खोडे, स्वाती भामरे,यशवंत निकुळे, श्याम बडोदे,अजिंक्य साने, सुनील देसाई,संध्याताई कुलकर्णी,सचिन कुलकर्णी, उदय जोशी,जितेंद्र चोरडिया, अवधुत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी,अजिक्य फरांदे, गोपी राजपूत,रफिक शेख, विलास देशमुख,विजय गायखे आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी