नाशिक शहरातील बिघडलेला कायदा, सुव्यवस्था व विस्कळीत वाहतूक व्यवस्थेबाबत (traffic system ) भाजपा शिष्टमंडळाची पोलीस आयुक्त यांच्याशी भेट घेवून उपाय करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यामध्ये विस्कळीत वाहतूक संदर्भात पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, शहरातील प्रवाशी वाहतूक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्या कोविड पुर्वी विभागनिहाय वारंवार बैठका होत होत्या. या बैठकांमध्ये विशिष्ठ भागातील वाहतूक कोंडी संदर्भात सुचना व त्यावरील उपाय योजना या बाबत चर्चा सत्र होत होते. परंतू सध्यांची वाहतूक कोंडी बघता पुर्वी प्रमाणे नियोजन बैठका सुरु कराव्यात या संदर्भात चर्चा करण्यात आली.(Discussion on deteriorating law, order and disrupted traffic system in Nashik city..)
सध्या शहरातील वाहतूक व्यवस्था (traffic system ) कोलमडली असून बऱ्याच ठिकाणी सांगायचेच झाले तर मुंबई नाका सर्कल, द्वारका सर्कल, मायको सर्कल, सिटी सेंटर मॉल, इंदिरानगर बोगदा, सीबीएस, रविवार कारंजा, निमानी बस स्टॅड तसेच गंगापुर रोडवरील सर्व सर्कल आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होणे हा दररोजचा नित्य नियम झाला आहे.
तसेच निवेदनात म्हटले आहे की,नाशिक शहर व उपनगरांमध्ये कायदा व सुव्यवस्था (traffic system ) बिघडवण्यास कारणीभूत असलेल्या समाजविघातक शक्ती विरोधी त्वरीत कार्यवाही करावी. शहरात दररोज खुन, चोऱ्या, दरोडे, गॅगवार, गाडयांची जाळपोळ प्रकार घडत आहे. विशेष म्हणेजे महिलांमध्ये चैन स्नॅचिंगचे प्रकार वाढल्यामुळे स्त्रीयांमध्ये असूरक्षीततेची भावना तयार झाली आहे. कायदयाची कडक अंमलबजावणी करावी. गुन्हेगार व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी जेणे करून नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्तांतर्फे योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली. गुन्हेगार व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी जेणे करून नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्तांतर्फे योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.
यावेळी आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.ॲड.राहुल ढिकले,भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, सरचिटणीस सुनिल केदार, काशिनाथ शिलेदार, ॲड.शाम बडोदे, हिमगौरी आडके, रोहिणी नायडू व उध्दव निमसे यांच्या स्वाक्षरी सह पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.