डॉ.निलेश राणे युवा प्रतिष्ठान, नाशिक आणि स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक मधील मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे 6 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे (6th National SDPF Games) आयोजन करण्यात आले आहे.7 ते 9 जून 2024 या तीन दिवसांची ही क्रीडा स्पर्धा असून आज दिनांक 7 जून रोजी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इन्कम टॅक्स आयुक्त, मुंबई. डॉ.रविराज खोगरे, नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.आदित्य मिरखेलकर, IIFL Foundation, Mumbai च्या CSR Head डॉ.चेतना खोगरे ,SDPF INDIA चे राष्ट्रीय महासचिव श्री.सतीश राणा तसेच डॉ. निलेश राणे युवा प्रतिष्ठान, नाशिकचे संस्थापक अध्यक्ष डॉ.निलेश मधुकर राणे (Dr. Nilesh Rane) हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सत्रसंचालन जिल्हा परिषद इगतपुरी येथील शिक्षिका आणि इराया फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष श्रीम.आरती बोराडे यांनी केले.(Dr. Nilesh Rane Yuva Pratishthan organises 6th National SDPF Games in Nashik)
सदर क्रीडा स्पर्धेसाठी 500 हून अधिक खेळाडूंची उपस्थिती ही लक्षणीय आहे. यादरम्यान खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, अथलेटिक्स या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कनिष्ठ व वरिष्ठ गटातून खेळाडूंना विविध खेळ प्रकारात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
सदर कार्यक्रमास स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन(SDPF) ऑफ इंडियाचे विविध राज्यातील पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्वांचे स्वागत डॉ. निलेश राणे यांनी केले.
पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी पुढीलप्रमाणे स्थान प्राप्त केले.
1. कब्बडी ज्युनिअर – महाराष्ट्र सुवर्ण पदक तर ओडिशा रजत पदक
2. बॅडमिंटन – ज्युनिअर गर्ल्स सिंगल – रजत पदक, सिनियर गर्ल्स डबल्स – सुवर्ण पदक प्राप्त
3. बॉईज under 19 डबल्स – सुवर्ण पदक, under 17 डबल्स – सुवर्ण पदक, under 17 सिंगलस् कांस्य पदक.
देशभरातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, ओडिशा, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, विदर्भ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड इत्यादी राज्यातील खेळाडू या 3 दिवसांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी उपस्थित आहेत.
ही क्रीडा स्पर्धा एका 8 वर्षांच्या विद्यार्थीनीमुळे देखील चर्चेचा विषय ठरली कारण पिंपरदा फलटण येथून आलेली सई भगत हिने 100 मीटर अथेलेटिक्स प्रकारात अतिशय उत्तम कामगिरी बजावली. वयाच्या साडे सहा वर्षांपासून धावणारी सई ही 5 किलोमिटर न थांबता धावणारी सर्वात लहान अथेलेटिक्स म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे तिची दखल घेतली जाणार आहे.
या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनात डॉ. निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली राजेंद्र गाढे, केतन निकम, राहुल पवार, शुभम सांगळे, प्रितेश काळे, ऋषिकेश दवंगे, निखिल लोखंडे यांच्या नियोजन समितीने काम केले.
डॉ.निलेश राणे युवा प्रतिष्ठान, नाशिक आणि स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक मधील मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे 6 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.7 ते 9 जून 2024 या तीन दिवसांची ही क्रीडा स्पर्धा असून आज दिनांक 7 जून रोजी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इन्कम टॅक्स आयुक्त, मुंबई. डॉ.रविराज खोगरे, नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.आदित्य मिरखेलकर, IIFL Foundation, Mumbai च्या CSR Head डॉ.चेतना खोगरे , SDPF INDIA चे राष्ट्रीय महासचिव श्री.सतीश राणा तसेच डॉ. निलेश राणे युवा प्रतिष्ठान, नाशिकचे संस्थापक अध्यक्ष डॉ.निलेश मधुकर राणे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सत्रसंचालन जिल्हा परिषद इगतपुरी येथील शिक्षिका आणि इराया फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष श्रीम.आरती बोराडे यांनी केले.