31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक येथे स्ट्राँगरुम भोवती ‘फोर्थग्रेड’ सुरक्षा;पोलिस आयुक्त संदीप कर्णिक

नाशिक येथे स्ट्राँगरुम भोवती ‘फोर्थग्रेड’ सुरक्षा;पोलिस आयुक्त संदीप कर्णिक

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ‘ईव्हीएम’ ठेवण्यात आलेल्या वेअर हाउस येथील ‘स्ट्राँगरुम’ भोवती चार स्तरात सुरक्षा नेमण्यात आली आहे. ‘सीआरपीएफ’ व ‘एसआरपीएफ’ च्या प्रत्येकी दोन तुकड्यांसह स्थानिक पोलिसांची वेअर हाउसभोवती पायी गस्त सुरु आहे. यासह तिथेच नियंत्रण कक्ष कार्यान्वित करुन तासाभराने सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, वेअर हाउस परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. ‘ईव्हीएम’ ठेवलेल्या ठिकाणी आतमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात आहेत.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ‘ईव्हीएम’(EVM) ठेवण्यात आलेल्या वेअर हाउस येथील ‘स्ट्राँगरुम’(strongroom) भोवती चार स्तरात सुरक्षा नेमण्यात आली आहे. ‘सीआरपीएफ’ व ‘एसआरपीएफ’ च्या प्रत्येकी दोन तुकड्यांसह स्थानिक पोलिसांची वेअर हाउसभोवती पायी गस्त सुरु आहे. यासह तिथेच नियंत्रण कक्ष कार्यान्वित करुन तासाभराने सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.पोलिस आयुक्त संदीप कर्णिक(sandip karnik) यांच्या आदेशान्वये, वेअर हाउस परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. ‘ईव्हीएम’(EVm) ठेवलेल्या ठिकाणी आतमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात आहेत.(‘Fourth grade’ security around strongroom in Nashik)

तर वेअर हाउसच्या बाहेरील जागेत राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्त करीत आहेत. यासह वेअर हाउसमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करुन एक पोलिस निरीक्षकांसह तीन अंमलदार कार्यरत आहेत.

तसेच ओळखपत्राशिवाय कोणालाही आत प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. वेअर हाउसच्या सीसीटीव्ही कक्षातही पोलिस नेमले आहेत. विशेष म्हणजे, वरिष्ठ पोलिस अधिकारी या सर्व बंदोबस्ताचा सातत्याने आढावा घेत आहे. वेअर हाउस परिसरात विनाकारण कोणीही टेहाळणी करणार नाही. कोणीही फिरणार नाही, यासंदर्भात काटेकोरपणे दक्षता घेण्याची सूचना बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाने केली आहे.

दोन्ही गस्ती सुरु

वेअर हाउससमोरील रस्त्यावर पायी गस्त करण्याचे आदेश वरिष्ठांनी अंमलदारांना दिले आहेत. यासह वाहन ‘पॅट्रोलिंग’ करुन प्रत्येक एक तासाने त्यासंदर्भात आढावा घेण्यात येत आहे. यासह वेअर हाउस परिसरातील महत्त्वाच्या चौकांमध्येही पोलिसांनी तळ ठोकला आहे. चार जूनपर्यंत या स्वरुपाचा बंदोबस्त रात्र व दिवस या दोन शिफ्टमध्ये नेमण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी