30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रConversion : हिंदू धर्माच्या महिलेचे बळजबरीने करण्यात आले धर्मांतर

Conversion : हिंदू धर्माच्या महिलेचे बळजबरीने करण्यात आले धर्मांतर

एका हिंदू महिलेचे (Hindu woman) बेकायदेशीररीत्या धर्म परिवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सदर घटना घडली आहे. पुण्याच्या भारतीय मानवाधिकार परिषदेने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.

एका हिंदू महिलेचे (Hindu woman) बेकायदेशीररीत्या धर्म परिवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सदर घटना घडली आहे. पुण्याच्या भारतीय मानवाधिकार परिषदेने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि या घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा उभारण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका धर्मांतराने पीडित झालेल्या महिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार भारतीय मानवाधिकार परिषदेकडे केल्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य ओळखून परिषदेने यासाठी सत्याशोधन समिती गठित केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून या पीडितेला न्याय देण्याची मागणी या परिषदेकडून करण्यात आली आहे.

या हिंदू महिलेचे जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यात आले. याबाबतची तक्रार सुरुवातीला महिलेने पोलिसांत देखील केल्याचे सांगण्यात येत आहे. पण येथील पोलिसांनी आणि त्या महिलेवर अत्याचार करणाऱ्यांनी बेकायदेशीर काम केल्याचा आणि मानवी अधिकारांचे घोर उल्लंघन केल्याचा निष्कर्ष परिषदेचे संचालक अविनाश मोकाशी यांनीआयोजित पत्रकार परिषदेत काढला. तसेच ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यात धर्मांतरणाविषयीचा कथित कायदा करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारचा कायदा तातडीने करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Abdul Sattar : शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोर अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत !

BEST : ‘बेस्ट’ने सुरु केली प्रवाशांसाठी नवी सुविधा

Azadi ka Amrit Mahotsav : भाजपच्या दृष्टीने देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, मग अमृतमहोत्सवाची इव्हेन्टबाजी कशाला?

धर्मांतराच्या गुन्हेगारीकरणामुळे मानवाधिकारांवर गदा येत आहे, असे मत अविनाश मोकाशी यांनी व्यक्त केले. बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी राज्य सरकारनेही दंडात्मक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणावा, अशी मागणी यावेळी उपस्थित असलेल्या ॲड. सोनवणे यांनी केली. तसेच कायद्याप्रमाणे योग्य न्याय देण्याची मागणी पीडित महिलेकडून करण्यात आली. यामुळे आता मानवी हक्कांचे उघड उल्लंघन केल्याबद्दल हस्तक्षेप करण्याचा आणि कारवाई सुरू करण्याचा निर्णय भारतीय मानवाधिकार परिषदेकडून घेण्यात आला आहे. या प्रकरणांत मानवी हक्कांचे घोर उल्लंघन झाले आहे, असा निष्कर्ष काढला आहे. असेही अविनाश मोकाशी यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी, संस्था याची योग्य माहिती घेऊन त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, या महिलेस आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करून दंडात्मक कारवाई करण्याचा पुढाकार घ्यावा, अशी मागणी मोकाशी यांच्याकडून करण्यात आली आहे. परिणामी, हे प्रकरण गांभीर्याने न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा परिषदेचे संचालक अविनाश मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी