29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रAjit Pawar : जळगावच्या सभेत अजित पवारांनी सरकारचे कान उपटले

Ajit Pawar : जळगावच्या सभेत अजित पवारांनी सरकारचे कान उपटले

जळगावच्या भाषणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. वेदांत समूह आणि फॉक्सकॉन कंपन्या गुजरातला हलवण्यावरुन महाराष्ट्रात राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे.

जळगावच्या भाषणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. वेदांत समूह आणि फॉक्सकॉन कंपन्या गुजरातला हलवण्यावरुन महाराष्ट्रात राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि व‍िरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीमध्ये जावून पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा प्रकल्प पुन्हा राज्यात आणावा असे आव्हान त्यांनी केले. पुन्हा दुसरा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असे सांगून गाजर दाखवू नये असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. अजित पवार जळगाव जिल्हयातील पाचोरा येथे बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचा खरपूस सामाचार घेतला.

ज्या प्रकल्पांच्या माध्यामातून राज्याला रोजगार मिळत असेल ते प्रकल्प राज्याबाहेर जाऊ दयायला नको. सरकाने या बाबत राजकारण करु नये असेही अजित पवार यांनी राज्य सरकारला ठणकावू सांगितले. सरकारने या बाबत कारवाई करून लक्ष घालायला हवे. आडीच महिने झाले तरी राज्यात अजून पालक मंत्री नेमले नाहीत. केवळ 18 जणांनी शपथ घेतली. बाकीच्यांना गाजर दाखवले. आशेवर ठेवले आहे. तीन महिने होतील पालक मंत्री नाही. त्यामुळे कामे रखडली आहेत. पालकमंत्री हा 25 ते 30 किमिटीचा अध्यक्ष असतो.

हे सुद्धा वाचा

Vedanta Foxconn Project : ‘वेदांता प्रकरणात पेंग्विनसेनेकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न’

Vedanta Foxconn Project : वेदांता – फॉक्सकॉनने शेपूट घातले, महाराष्ट्राला पुन्हा लाल गाजर दाखवले

Garba Song : गरब्यासाठी फाल्गुनी पाठक यांचे नवे गाणे रिलीज

कलेक्टर म्हणतात, नवीन पालक मंत्री आल्याशिवाय नवीन कामे करू नका. महाविकास आघाडीच्या काळात केलेली कामे करू देत नाही. स्वत:ची कामे देखील करत नाहीत. तुम्ही केवळ 50 आमदारांचेच मुख्यमंत्री आहात का? असा खडा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला. तुम्ही राज्‍याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहात. तर निवडणूकी पुरते राजकारण ठेवा. तु कोणत्या गटाचा, मी कोणत्या गटाचा आहे हे पाहू नका. पालकमंत्री निवडण्यासाठी नवीन सरकार मुहूर्त शोधत आहे. आता पितरपाठ चालू आहे म्हणून पालकमंत्री पदाची निवड करत नाही. तसेच 12 ते 15 मंत्री अजून चार्ज घेत नाहीत. त्यांना दिलेली खाती मान्य नाहीत. दादाभुसेंची तर वाईट आवस्था झाली आहे. त्यांना खजिन खाते दिले .या सरकामध्ये कुणाचा कोणाला पायपोस नाही.

कोणी उठतो हवेत गोळीबार करतो. एकतर गोळीबार करण्याचे कारण नाही. कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला ही मोगलाई आहे काय ? मारा, तोडा, फोडा, पोटात लाथा मारा. हे काय चालंलय. हे सगळं घडत असतांना एकनाथ शिंदे गप्प का बसतात असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोमवार पासून चेक मिळणार म्हणाले होते परंतु आज गुरूवार आहे अजून चेक मिळाले नहीत. पंचनामे एकदम ओके….. झालेत. शेतकऱ्याला मदत करा. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. असे अजित पवारांनी सरकारला ठणकावून सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी