मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून पहिली मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रवाना केली. या ट्रेनचे तिकीट बुकिंग, भाडे, वेग हा सर्व तपशील आपण जाणून घेऊया.
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन देशाची व्यापारी राजधानीला असलेल्या मुंबईला महाराष्ट्रातील नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि साईनगर शिर्डी या तीर्थक्षेत्रांशी जोडेल. या देशातील दहाव्या वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा शनिवारी, 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. मुंबई-शिर्डी मार्गावर ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. ही ट्रेन 16 डब्यांची असून ती सरासरी 64.35 किमी प्रति तास वेगाने धावेल. 22223 अप आणि 22224 डाऊन असे या गाडीचे क्रमांक असतील.
#VandeBharat#AmchiVande pic.twitter.com/6Yhdl26ohA
— DRM Pt. Deen Dayal Upadhyaya Division (@DRM_DDU) February 10, 2023
ही गाडी मुंबईहून नाशिक हे अंतर फक्त अडीच तासात पार करेल. पुढे नाशिक ते शिर्डीसाठी मात्र पावणेतीन तास लागतील. त्यामुळे मुंबई ते शिर्डी हे अंतर कापायला सव्वापाच तास लागतील. ही ट्रेन मुंबई सीएसएमटी स्थानकातून सकाळी सहा वाजून 20 मिनिटांनी सुटेल. 6.30 दादर, 6.49 ठाणे, 6.57 नाशिकरोड आणि 11 वाजून 40 मिनिटांनी ती शिर्डीत पोहोचेल. शिर्डीहून सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी निघून रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. नाशिकरोड 7.25, ठाणे रात्री 10.05 आणि दादर 10.28 अशा या गाडीच्या पोहोचण्याच्या वेळा आहेत. मुंबई सीएसएमटी ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे आरक्षण सुरू झाले आहे. देशभरातील कोणत्याही तिकीट बुकिंग काउंटरवरून किंवा IRCTC द्वारे या गाडीचे तिकीट बुक केले जाऊ शकते.
22223 मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे –
AC चेअर कार (CC) भाडे :
- सीएसएमटी ते साईनगर शिर्डी – रु. 975
- सीएसएमटी ते दादर – रु. 365
- सीएसएमटी ते ठाणे – रु. 365
- सीएसएमटी ते नाशिकरोड – रु. 720
एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) भाडे :
- सीएसएमटी ते साईनगर शिर्डी – रु. 1,840
- सीएसएमटी ते दादर – रु. 690
- सीएसएमटी ते ठाणे – रु 690
- सीएसएमटी ते नाशिकरोड – रु. 1,315

22224 साईनगर शिर्डी-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे –
AC चेअर कार (CC) भाडे :
- साईनगर शिर्डी ते सीएसएमटी – रु 1,130
- साईनगर शिर्डी ते नाशिकरोड – रु 600
- साईनगर शिर्डी ते ठाणे – रु. 1,065
- साईनगर शिर्डी ते दादर – रु. 1,120
एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) भाडे :
- साईनगर शिर्डी ते सीएसएमटी – रु. 2,020
- साईनगर शिर्डी ते नाशिक रोड – रु. 1,145
- साईनगर शिर्डी ते ठाणे – रु. 1,890
- साईनगर शिर्डी ते दादर – रु. 1,985
हे सुद्धा वाचा :
- मुंबई-पुणे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट सर्वात महाग; जाणून घ्या तिकिटाचे दर
- वंदे भारत एक्सप्रेस का आहे खास, ते जाणून घ्या…
- सीएसएमटी, फोर्टसह अर्धी मुंबई फेरीवालामुक्त, टॅक्सीवाल्यांचाही गोंगाट नाही; मोदीजी रोज मुंबईत या, रोज उद्घाटने करा, मुंबईकरांचे चालणे सुसह्य करा!
केटरिंग शुल्क:
या ट्रेनमध्ये खाद्यपदार्थांची निवड ऐच्छिक आहे. तथापि, जर कोणी नो फूडचा पर्याय निवडला असेल, तर कॅटरिंग शुल्क भाड्यातून वजा केले जाईल.