नाशिक शहरातील विविध 22 ठिकाणी सिग्नल (Signal system) बसवण्याचे आदेश सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा यांनी दिलेले होते. स्मार्ट सिटी योजना अंतर्गत याबाबत कार्यवाही करण्यात येत होती. शहरात बसवणाऱ्या 22 सिग्नल पैकी तब्बल 10 सिग्नल हे गंगापूर रोड येथे बसवण्यात येणार होते. सप्तरंग चौक, विद्या विकास सर्कल, एबीटी सर्कल, हुतात्मा सर्कल, भोसला टी पॉइंट, मॅरेथॉन सर्कल , प्रसाद सर्कल दत्तू चौक सर्कल, डी के नगर निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, सिग्नल यंत्रणा (Signal system) बसवण्यात येणार होती.अशा प्रकारांनी सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी नाराजी व्यक्त केली.(Nashik MLA Devyani Farande demands scrapping of signalling system)
गंगापूर रोड येथे बसवण्यात 10 सिग्नलमुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतूक थांबा निर्माण होणार होता, गंगापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांच्या वेळेचे नुकसान होणार होते. अशा प्रकाराने नवीन दहा सिग्नल बसवण्याचे काम करण्यापूर्वी स्मार्ट सिटी योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीशी किंवा नागरिकांची चर्चा केलेली नाही.
अशा प्रकारांनी सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त करताना सदरची कामे तत्काळ रद्द करण्याची मागणी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर व पोलीस आयुक्त, श्री संदीप कर्णिक यांच्याकडे केली. तसेच मंजूर काम एका ठिकाणी व काम दुसऱ्या ठिकाणी सुरू असलेल्या बाबत आश्चर्य व्यक्त करताना अशा प्रकाराने परस्पर काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त यांनी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन करून अशा प्रकाराने काम केले बाबत नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांची मागणी असणाऱ्या केबीटी सर्कल खेरीज गंगापूर रोड परिसरातील इतर सर्व प्रस्तावित सिग्नल यंत्रणा रद्द करण्याचे आदेश दिले.