26.1 C
Mumbai
Monday, February 10, 2025
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकच्या मनपा मुख्यालयात राष्ट्रध्वजाचा अपमान

नाशिकच्या मनपा मुख्यालयात राष्ट्रध्वजाचा अपमान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाने सन २०२२ मध्ये हर घर तिरंगा अभियान राबवले राबवले होते. त्याअंतर्गत विभागीय महसूल आयुक्‍त कार्यालयाने दोन लाख तिरंगा ध्वजाच्या (National flag) विक्रीचे उद्दिष्ट महापालिकेला दिले होते. मनपाने त्यासाठी ध्वज तयार केले . त्यातून विक्री किती झाली हे गुलदस्त्यात असले तरी गेल्या दोन वर्षांपासून हे ध्वज मनपा मुख्यालयातील तळघरात असलेल्या गोदामात चक्क धूळखात पडून आहेत. त्यामुळे मुख्यालयातच कर उपायुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर राष्ट्रध्वजाचा अवमान ( National flag disrespected at NMC headquarters) होत असताना या दोषींवर कारवाई करणार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.(National flag vandalised at Nashik MUNICIPAL headquarters)

देशभरात 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला होता. त्या अंतर्गत नाशिक महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये दोन दिवसात 13 हजार 458 तिरंगा ध्वजाची विक्री देखील झाली होती. नागरिकांना तिरंगा खरेदीसाठी आवाहन करतानाच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील ध्वज खरेदी अनिवार्य करण्यात आली होती.स्वातंत्र्यळढ्याच्या स्मृतींना उजाळा व क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी केंद्र शासनाने हर घर तिरंगा उपक्रम राबविला होता . या उपक्रमांतर्गत नाशिक शहरात प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले होते. त्यासाठी विभागीय महसूल आयुक्‍त कार्यालयाने दोन लाख तिरंगा ध्वजाच्या विक्रीचे उद्दिष्ट महापालिकेला दिले होते. महापालिकेच्या 4000 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने ध्वज खरेदी केला की नाही, याची नोंद बंधनकारक करण्याच्या सूचना तत्कालीन आयुक्‍त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या होत्या . हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. तसेच क्रेडाई, नरेडको या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनांसह निमा, आयमा, नाईस, शाळा, महाविद्यालय सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी तत्कालीन मनपा आयुक्तांनी सवांद देखील साधला होता.

काय होते हर घर तिरंगा अभियंतां
जगभरातील अधिकाधिक भारतीयांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान घेण्यात आले होते.

सव्वा लाख ध्वज निघाले होते सदोष
हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक महापालिकेला दोन लाख राष्ट्रध्वजांच्या वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन लाख ध्वज प्राप्त झाल्यांनतर मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालयांमध्ये त्याचे वितरण करण्यात आले . गेल्या आठ दिवसात जवळपास 48 हजार नागरिकांनी ध्वज खरेदी केले होते. मात्र त्यात तब्बल सव्वा लाख ध्वज सदोष असल्याचे समोर आले होते. त्यात अनेक ध्वजामध्ये तिन्ही रंगाचा आकार एक समान नाही. तसेच ध्वजाचे कापड निकृष्ट दर्जाचे, . ध्वजाची लांबी रुंदी अनियमित्त असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्याने महापालिकेने सदोष ध्वजांचे वितरण थांबवले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी