32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रAmbadas Danve : 'शिंदे सरकारची पकड ढिली, प्रशासनाचा शेतकऱ्यांवर अन्याय'

Ambadas Danve : ‘शिंदे सरकारची पकड ढिली, प्रशासनाचा शेतकऱ्यांवर अन्याय’

राज्यातील नवीन शिंदे-फडणवीस सरकार आपसात भांडण्यात व्यस्त आहेत. जनता मात्र कष्ट उपसते आहे. राजकारण्यांचा सत्ता संघर्ष विकोपाला गेला आहे.

राज्यातील नवीन शिंदे-फडणवीस सरकार आपसात भांडण्यात व्यस्त आहेत. जनता मात्र कष्ट उपसते आहे. राजकारण्यांचा सत्ता संघर्ष विकोपाला गेला आहे. राज्य सरकारच्या निष्काळजीपणा व अकार्यक्षमतुमुळे नाशिकसह राज्यातील पुरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नाशिक जिल्ह्यातील वांजरवाडी व सिन्नर येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकारची प्रशासनावरची पकड ढिली झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत मिळण्यास उशीर होत आहे. याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप अंबादास दानवे ( Ambadas Danve) यांनी केला आहे.

पूर ओसरुन आज आठवडा झाला तरी देखील पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. तहसिलदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे अजून पर्यंत पंचनामे आले नाहीत. नाशिक आण‍ि सिन्नर शहरात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतांनाही सरकारी यंत्रणा निष्क्रीय झाली आहे. पुरग्रस्तांना सरकारकडून मदत मिळत नाही. मात्र शिवसेना त्यांच्या मदतीसाठी उभी राहील अशी ग्वाही अंबादास दानवे यांनी दिली. सन्निर तालुक्यातील कुसुमबाई घारेपडे व‍ कविता गडक यांच्या घरांची पाहणाी दानवेंनी केली.

Ambadas Danve : 'शिंदे सरकारची पकड ढिली, प्रशासनाचा शेतकऱ्यांवर अन्याय'

पुरामुळे यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. त्यांना तात्काळ निवारा आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध झाल्या पाहिजेत आशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अंबादास दानवे यांनी दुर्गम भागातील बंधाऱ्याची पाहणी केली. सिन्नर तालुक्यातील सोनंबे येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुर्गम भागात गुरदरी बंधाऱ्याची पाहणी अंबादास दानवे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

Dhananjay Munde : धनंजय मुंडे धावले अडचणीत आलेल्यांच्या मदतीसाठी

Governor : ‘ठाकरे सरकारची 12 आमदारांची यादी रद्द करणे ही संवैधानिक चूक’

Hemant Soren : ‘अखेर’ हेमंत सोरेन विश्वास दर्शक ठराव जिकंले

अंबादास दानवेंनी ट्रॅक्टरने काही अंतर पार केले. त्यानंतर ते चालत गेले. यावेळी  बंधाऱ्याचे कामही तातडीने हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर गाडे, सोनांबे गावचे सरपंच डाँ. रवींद्र पवार तसेच स्थानिक गावकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी