नाशिक महानगरपालिका (NMC) आणि स्मार्ट सिटी (Smart city mistake) कंपनी यांचे जीपीओ टाकीजवळ पाईप जोडण्याचे काम सुरू आहे.तेथे लाईन डॅमेज झाल्यामुळे गेल्या २४ तासात लाखो लिटर पाणी वाया (water wasted ) गेले आहे. एका बाजूला पाणी टंचाई होणार म्हणून गंगापूर धरणामध्ये चर खोदण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे असे लाखो लिटर पाणी वाया (water wasted )जात असेल तर त्याला जबाबदार कोण असा सवाल काँग्रेस पदाधिकारी राजेंद्र बागुल यांनी उपस्थित केला आहे.(Smart city mistake: Lakhs of litres of water wasted )
पाणी कपातीचे धोरण आणले जाते आहे. आठ आठ दिवस भद्रकाली परिसरामध्ये पाणी मिळत नाही. शहरभर आया बहिणी हंडे घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. आणि येथे महानगरपालिका अधिकारी व स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे व दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे; असे प्रकार वारंवार घडून सुद्धा कोणताही अधिकारी याची जबाबदारीची जाणीव कोणाला करून दिली जात नाही आणि याची जबाबदारी कोणी घ्यायला तयारही नाही; आपल्याला काय त्याचे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.
महापालिका आयुक्त अशा कामचूकार- बेजबाबदार अधिकाऱ्यांना किती दिवस पाठीशी घालणार व अशा प्रकारे महानगरपालिकेचे डोळ्यादेखत किती नुकसान सहन करावे लागणार, ही भावना नागरिकांमध्ये आहे. संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या अक्षम्य चुकीचा जाब विचारला गेला पाहिजे व आयुक्तांनी त्यांना शिक्षा केलीच पाहिजे. यापूर्वी बेजबाबदारपणे काम करून महापालिकेच्या पाण्याला गटारीची वाट दाखवणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे व त्यांच्यापासून याबाबतची भरपाई सुद्धा केली गेली पाहिजे. स्मार्ट सिटी कंपनीने नेमलेल्या सब एजन्सी कोणत्या आहेत त्यांचे वर नियंत्रण कोणाचे आहे त्या तेवढ्या कॅपेबल व त्या दर्जाच्या आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे.
रोजंदारी मजुरांकडून ड्रॉइंग देऊन टेम्पररी इंजिनियरांकडून अतिशय घाई गर्दीत ही कामे उरकण्याचा अट्टाहास चाललेला दिसतो आहे. सदरच्या कामावर महापालिका अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही व सुपर विजन नाही; त्यामुळे कशा दर्जाचे काम चालू आहे, हे नाशिककर रोज पाहत आहेत आणि त्रास सहन करतात. यानंतरच्या त्रासाला व सदरच्या निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी व समस्यांना मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आत्ताच काम पूर्ण होण्याअगोदर तरी या सर्व कामांची स्पेशल ऑडिट होऊन चौकशी होऊन काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत. सरकार व महानगरपालिका प्रशासन याबाबत इतक्या वेळा तक्रारी करूनही, चौकशी का करत नाहीत. कि या बेबाबदारपणे काम करणाऱ्या प्रवृत्तीला सर्वच संस्थांची मूकसंमती आहे. पावसाळ्यानंतर याबाबत अनेक समस्यांना स्मार्ट सिटी मुळे सामोरे जावे लागणार आहे; याची दखल माननीय आयुक्त साहेब यांनी घ्यावी, अशी विनंती! अन्यथा नाशिककर नागरिकांना व काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर आंदोलन करावे लागेल. असा इशारा काँग्रेस पदाधिकारी राजेंद्र बागुल यांनी दिला आहे.