फिक्की व महाराष्ट्र चेंबरच्या पाठिंब्याने ARISE स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) च्या माध्यमातून पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील ( West and Central Africa) व्यवसायाच्या संधी (business opportunities ) या विषयावर संवादात्मक सत्र शुक्रवार दि. ७ जून २०२४ रोजी सकाळी ११ ते १ हॉटेल बीएलव्हिडी, सातपूर येथे संपन्न झाले. भारतीय कंपन्यांसाठी पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील ARISE SEZ द्वारे गुंतवणूक आणि व्यवसाय करण्याची क्षमता आणि फायदे याविषयी माहिती देऊन चर्चा करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे शाखा चेअरमन संजय सोनवणे, फिक्कीचे संचालक दिपक मुखी , फिक्कीचे एनइसी मेंबर नंदेश यंदे, अराईसचे मार्केटिंग हेड नागेश राणे ( Nagesh Rane), ग्रीन बॅक अडवायझरी सर्विसेस प्रा. लि. चे संचालक सुब्रमनियम शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते. स्वागत फिक्कीचे एनइसी मेंबर नंदेश यंदे यांनी केले. (Take advantage of business opportunities in West and Central Africa: Nagesh Rane)
फिक्कीचे संचालक दिपक मुखी यांनी प्रास्ताविक करताना फिक्कीच्या कार्याची माहिती देऊन देशातील उद्योगांना जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र चेंबरचे शाखा चेअरमन संजय सोनवणे यांनी राज्यातील व्यापार, उद्योगाला देश व जागतिकस्तरावर व्यापार उद्योगांच्या संधीची माहिती देणे, व्यापार उद्योगांचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र चेंबर स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. शताब्दी वर्षाकडे वाटचाल सुरु असून चेंबरने देश व जागतिक स्तरावर राज्यातील व्यापार उद्योगांचा विस्तार होण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे. पश्चिम व मध्य आफ्रिकेत व्यापार उद्योगांच्या (business opportunities ) मोठ्या प्रमाणात संधी असून अराईज च्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन व सर्व प्रकारची मदत मिळनार असून सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. अराईसचे मार्केटिंग हेड नागेश राणे यांनी ARISE पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) मध्ये विशेष आर्थिक क्षेत्रे विकसित करत आहे आणि गॅबॉन, टोगो, बेनिन, आयव्हरी कोस्ट, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो, रिपब्लिक ऑफ द काँगो, चाड, रवांडा, सिएरा यासह 10 वाढत्या देशांमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. आफ्रिकेतील अंतर्गत अग्रगण्य गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून भारत उदयास आला आहे. भारत सरकारने भारतीय उद्योजकांना आफ्रिकन बाजारपेठा शोधण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले आहे.
पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत वस्त्र, कृषी प्रक्रिया (काजू, सोया, मका, कोको, शिया, अननस आणि टोमॅटो), इमारती लाकूड, खते आणि रसायने, पुनर्वापर उद्योग, फार्मा, प्लास्टिक , ऑटोमोबाईल, पॅकेजिंग, इलेक्ट्रॉनिक्स, फोन आणि संगणक असेंब्ली, बांधकाम साहित्य, इलेक्ट्रिक वाहन या क्षेत्रांमध्ये भारतीय कंपन्यांसाठी व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या संधी याविषयी चित्रफितीद्वारे माहिती दिली. तसेच भारतीय कंपन्यांसाठी आफ्रिकन बाजारपेठेत इंडस्ट्रियल शेड मॅन्युफॅक्चरिंग (फॅक्टरी आणि स्टोरेज), सिरॅमिक्स, इंडस्ट्रियल वेस्ट रीसायकलिंग, टू-व्हीलर टायर मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग (लिक्विड आणि सॉलिड) साठी अराईज संयुक्त उपक्रमाची संधी देत असल्याची माहिती दिली. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नागेश राणे व सुब्रमनियम शर्मा यांनी दिली. ग्रीन बॅक अडवायझरी सर्विसेस प्रा. लि. चे संचालक सुब्रमनियम शर्मा यांनी गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना फायनान्स कशाप्रकारे उपलब्ध करून दिला जातो याची माहिती दिली.
याप्रसंगी श्रीकांत पडोळ, सुहास सराफ, श्रीकांत पाटील, तुषार चौधरी, आशुतोष गायकवाड, स्वाती महाजन, पूजा अहिरे, योगेश लोढा, फिक्कीचे डेप्युटी डायरेक्टर प्रदिप अहिरे, महाराष्ट्र चेंबरचे सहायक सचिव अविनाश पाठक आदिंसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.