28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआता समृध्दी महामार्ग आणखी सुसाट होणार

आता समृध्दी महामार्ग आणखी सुसाट होणार

टीम लय भारी

मुंबईःउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे समृध्दी महामार्ग आहे. हा प्रकल्प चांगल्या प्रकारे पुर्ण करण्याकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष लागले आहे. समृध्दी महामार्गाचा टप्पा लवकरच पुर्ण करणार, असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृध्दी महामार्गाचे काम अतिषय वेगाने सुरु आहे. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा महामार्ग लवकरच पुर्ण व्हावा असे वाटते आहे. त्यामुळे आता हा महामार्ग आणखी सुसाट होणार आहे.

समृध्दी महामार्गाला आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले. देवेंद्र फडणवीसांचा हा ‘महत्वाकांक्षी प्रकल्प‘ आहे. त्यांनी विश्वास दाखवला. हा प्रकल्प वेगाने सुरु आहे. नितीन गडकरी हे दररोज 1236 किमी रस्ता तयार करुन घेतात. रोड चांगला होत आहेत.आमच्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असेही मुख्यमंत्री आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

समृध्दी महामार्गामुळे मराठवाडा तसेच विदर्भाचा विकास होणार आहे. वाहतुक दळणवळण, उदयोग, व्यापाराला चालना मिळणार आहे. नागपूर मुंबई प्रवासाला 14 तास लागतात.हा महामार्ग सुरु झाल्यानंतर हे अंतर केवळ 8 तासांमध्ये पार करता येणार आहे.हा प्रकल्प 12 जिल्हयांतून जातो. त्यामुळे 26 तालुके 392 गावांचा विकास होणार आहे.

हे सुध्दा वाचा:

जपानच्या माजी पंतप्रधानांवर जिवघेणा हल्ला

भाजपच्या लाडक्या बंडखोर आमदाराने हिंदुत्ववादी फडणवीसांना बनवले ख्रिश्चन

ब्रेकिंग : हवामान खात्याचा मुंबईकरांना ‘रेड अलर्ट’, दुपारनंतर ‘मुसळधार’चा जोर वाढवणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी