34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रKEM Hospital: केईएम हॉस्पिटल मधील नर्सेस आक्रमक; रुग्णालय प्रशासनविरोधात आंदोलन

KEM Hospital: केईएम हॉस्पिटल मधील नर्सेस आक्रमक; रुग्णालय प्रशासनविरोधात आंदोलन

मुंबईमधील केईएम (KEM) रुग्णालयात प्रशासनाविरोधात 300 परिचारिकांनी एकत्र येऊन हॉस्पिटल बाहेर आंदोलन सुरु केले आहे.

मुंबईमधील केईएम (KEM) रुग्णालयात प्रशासनाविरोधात 300 परिचारिकांनी एकत्र येऊन हॉस्पिटल बाहेर आंदोलन सुरु केले आहे. हॉस्पिटल मधील नर्सेस आणि वॉर्डबॉय हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. रुग्णालयाबाहेर येऊन सर्व परिचारिकांनी प्रशासनाविरोधात जाऊन मोठ्याने घोषणाबाजी देत ठिय्या आंदोलन केले. रुग्णालयात नर्सेस उपस्थित नसल्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली होती. परिचारिकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. रुग्णालयातील प्रशासनाने या नर्सेसना नर्स क्वार्टर रिकामे करून आपले स्थलांतर टिबी रुग्णालयात करण्यास सांगितले असता या स्थलांतराचा परिचारिकांना विरोध दर्शवला आहे.

नर्सिंग क्वार्टर रिकामे करण्याची नोटीस
नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेले नर्सिंग क्वार्टर रिकामे करण्याची नोटीस मिळाल्यानंतर सुमारे 300 परिचारिकांनी केईएम हॉस्पिटल परळ येथील डीन कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांना केईएम रुग्णालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई सेंट्रल येथील शिवडी टीबी रुग्णालयात पर्यायी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातनंतर परिचारिकांनी रुग्णालयाजवळ राहण्याची मागणी केली आहे. एक परिचारिका म्हणाली, आम्ही 8-12 तास काम करतो जे कधीकधी 14 तासांपर्यंत वाढते. तसेच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आम्हाला आपत्कालीन फोन कॉल्स येतात. त्यामुळे परळहून मुंबई सेंट्रलला हलवण्यापेक्षा आम्ही हॉस्पिटलजवळ राहणे महत्त्वाचे आहे.

हे सुध्दा वाचा

MNS Against Rahul Gandhi : राहूल गांधींच्या विरोधात मनसे आक्रमक; पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले

Narayan Rane : अखेर राणेंनी स्वत:च ‘अधीश’ बंगल्यावर चालवला हातोडा

Recruitment : नोकरभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी सरकारचा मोठा निर्णय

शिकाऊ परिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वसतीगृहाचा स्लॅब कोसळला आणि स्वयंपाक बनवण्याचे काम करणाऱ्या संगीता चव्हाण या महिला त्यात गंभीर जखमी झाल्या. त्याच कारणास्तव वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या 300 शिकाऊ परिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था शिवडीतील टिबी रुग्णालयात केली जात आहे. नुकतेच नूतनीकरण केलेल्या शिवडी क्षयरोग रुग्णालयातील दोन वॉर्डांची निवड केईएम रुग्णालयातील परिचारिकांसाठी करण्यात आली आहे. या रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये वसतीगृह बनवले जात आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचे निदान करणाऱ्या रुग्णालयांमध्ये शिकाऊ नर्सेसची राहण्याची व्यवस्था केल्याने त्यांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता दाट आहे.

25 नोव्हेंबरपर्यंत इमारत रिकामी करण्याची नोटीस
केईएम रुग्णालयाच्या अधिका-यांनी परिचारिकांना 25 नोव्हेंबरपर्यंत इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. त्यात असेही म्हटले आहे की, जर कोणीही या इमारतीतून स्थलांतर करण्यास नकार दिला तर ते त्यांच्या धोक्यात येईल आणि त्याचे परिणाम केईएम प्रशासन हे करू शकणार नाही. त्यासाठी ते स्वतः जबाबदार धरले जातील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी