27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरमहाराष्ट्रदैव देते आणि कर्म नेते; दीड कोटी जिंकलेल्या पोलिसावर कारवाई!

दैव देते आणि कर्म नेते; दीड कोटी जिंकलेल्या पोलिसावर कारवाई!

माहिती तंत्रज्ञान यामुळे समाजात बदल घडत आहेत. याचा फायदा घेत ऑनलाइन गेमचे फॅड आले असून हे फॅड पिंपरी- चिंचवडमधील पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना महागात पडले आहे. ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममुळे ते दीड कोटी जिंकले अन त्यांचे नशीब उजळले; पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. त्यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पण विभागीय चौकशीमध्ये त्यांना स्वतःचे  म्हणणे  मांडण्याची मुभा मिळणार आहे. दरम्यान, ऑनलाइन गेम हे आधुनिक झुगार झाले असून त्यातून नवी झुगार खेळण्याची पद्धत विकसित झाली असून त्याला कायद्याने बंदी नाही.

क्रिकेट वल्ड कपवेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली आणि त्यांनी लाखो रूपये जिंकले. त्यामुळे झेंडे काही दिवसांपुर्वी चर्चेचा विषय ठरले. पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सोमनाथ झेंडे यांचे क्रिकेटचे प्रचंड प्रेम आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांना ड्रीम इलेव्हन ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल ठरली. त्यात सोमनाथ झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. झेंडेंच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली.
हे सुद्धा वाचा 

पांडुरंग बरोरांनी केली मुख्यमंत्र्यांची कोंडी
आरटीओच्या बदल्यामधील गैरव्यवहाराला बसणार चाप, बदल्या आता ऑनलाईन
ड्रगमाफिया ललित पाटीलच्या डोक्यावर कुणाचा हात?
दरम्यान तरुणाई अशा ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊ नये, अशा ऑनलाईन गेममुळे त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, स्वतः पोलीस अधिकाऱ्यानेच गेममुळे चुकीचा संदेश दिल्याचे  अनेकांकडून बोलले  जात आहे. त्यामुळे पीएसआय झेंडेना दोषी ठरवण्यात आले आहे.

ऑनलाइन गेमिंगचे आकर्षण 

मनोरंजनासाठी लोक ऑनलाइन गेमिंगकडे आकर्षित होतात. पण, हे निव्वळ मजा आणि गेम्स एवढ्यापुरतंच मर्यादित नसते. व्हर्च्युअल गेमिंगमध्ये आयडेंटिटी थेफ्ट, सायबर बुलिंग, फिशिंग आणि क्रेडिट कार्ड चोरी यासारखे अनेक धोके असतात. ऑनलाइन गेमिंगच्या बाबतीत मुले पालकांप्रमाणेच वागताना दिसतात. त्यामुळे, या गुंतागुंतीच्या डिजिटल जगात पालक आणि मुलांचे खासगीपण आणि सुरक्षेला धोका ठरू शकणाऱ्या बाबींची त्यांना जाणीव करून देणे अत्यंत महत्त्वाचे  आहे. दरम्यान ऑनलाइन खेळाचे वेड समाजातील सगळ्याच घटकांना लागले असून त्यातून पोलिस सुटलेले नाहीत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी