28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeशिक्षणकाय म्हणता ! जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त एकच विद्यार्थी...

काय म्हणता ! जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त एकच विद्यार्थी…

किशोर मानकर हे शिक्षक शाळेत शिकवण्यासाठी दररोज १० किमी पेक्षा जास्त अंतर प्रवास करतात. तथापि, त्यांचा विद्यार्थी फक्त एकच आहे.

जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे ज्ञान मिळवणे. शिक्षण हे एक साधन आहे जे लोकांना ज्ञान, कौशल्य, तंत्र, माहिती प्रदान करते, त्यांना त्यांचे कुटुंब, समाज आणि राष्ट्राप्रती त्यांचे हक्क आणि कर्तव्ये जाणून घेण्यास सक्षम करते. हे जग पाहण्याची दृष्टी आणि दृष्टीकोन वाढवते. मात्र यात जिद्द आणि चिकाटी असलेल्या आपल्या महाराष्ट्रातील एका मास्तरांची नोंद प्रामुख्याने घ्यावी लागले ज्यांनी राज्यातील प्रत्येकाचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हे मास्तर शाळेत शिकवण्यासाठी दररोज १० किमी पेक्षा जास्त अंतर प्रवास करतात. तथापि या कथेतील पकड असा आहे की, त्यांचा विद्यार्थी फक्त एकच आहे.

यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत एक शिक्षक आणि अनेक शाळा आपण पाहिल्या आहेत. मात्र तुम्ही कधी अशी जिल्हा परिषद शाळा पाहिली आहे का ज्यात फक्त एकच विद्यार्थी आहे? आणि एकच शिक्षक त्या विद्यार्थ्याला शिकवतात? वाशिम जिल्ह्यातील गणेशपुरमध्ये अशीच एक शाळा आहे, आणि गणेशपूरची ही शाळा या एका विद्यार्थ्यांसाठी अखंडपणे सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : Aurangabad News : औरंगाबादच्या शाळेत भरली ‘भाकरी’ बनवण्याची स्पर्धा

जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांच्या ‘थेट भरती’ची प्रतीक्षा कायम

VIDEO : १९ गावचे पाणी प्यायलेला अधिकारी !

वाशिम जिल्ह्यातील सर्वात लहान गाव गणेशपूर आहे. गावची लोकसंख्या दीडशे ते दोनशेच्या घरात आहे. याच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गांना परवानगी आहे, मात्र शाळेत एकच विद्यार्थी आहे. कार्तिक शेगोकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो तिसरीत शिकतो. शिक्षक किशोर मानकर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या दोन वर्षांपासून फक्त एकच विद्यार्थी आहे. शाळेत विद्यार्थी संख्या नसल्याने एका विद्यार्थ्यालाच शिक्षण दिले जाते. मात्र तरीही ही शाळा रोज भरते.

एकीकडे अनेक विद्यार्थी सरकारी शाळांकडे पाठ फिरवत असताना दुसरीकडे कार्तिक मात्र आपलं शिक्षण पूर्ण करून काहीतरी करून दाखवण्याच्या इराद्याने रोज शाळेत जातो. दररोज त्याचे शिक्षक त्याला शिकवण्यासाठी १० किमीवरून येतात. हे दोघेच राष्ट्रगीत म्हणतात, प्रार्थना होते आणि नंतर कार्तिकला दिवसभर शाळेत शिकवलं जातं. कार्तिक एकटा असला तरी मी त्याला शिकवतो आणि मला कंटाळाही येत नाही, असं शिक्षक किशोर मानकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी