28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपरशुराम घाट पुढील आठ दिवस राहणार बंद

परशुराम घाट पुढील आठ दिवस राहणार बंद

टीम लय भारी

रत्नागिरी : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण गेल्या २४ तासात पडलेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी आपात्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी राज्यात एनडीआरएफ पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. यामुळे पुढील आठ दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांपासून परशुराम घाटात पावसाची संतत धार सुरु आहे. त्याचबरोबर या घाटातील महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने हा घाट २० तासांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पण हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर दरड कोसळल्याने पुन्हा हा घाट बंद करण्यात आला आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक कळंबस्ते-लोटे मार्गाने वळविण्यात आली आहे.

या घटनेनंतर येथील नागरिकांनी प्रशासनाला या घाटातील दरड कोसळणाऱ्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले आहे. पावसाळ्यात या घाटात कायमच मोठे दगड कोसळत असतात. त्यामुळे दरवर्षीच हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. दरम्यान, या घटनेनंतर या धोकादायक बनलेल्या घाटाची पाहणी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून करण्यात आली.

हे सुद्धा वाचा :

राज्यात पुन्हा ‘मुसळधार’चा हाहाकार?

कोल्हापूरकरांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

रस्त्यावर धावणारी ‘जलपरी’ तुम्ही पाहिली का?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी