34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeसंपादकीयPhulandevi : चंबळच्या खोऱ्यातील फुलनदेवी "खासदार" कशी बनली ?

Phulandevi : चंबळच्या खोऱ्यातील फुलनदेवी “खासदार” कशी बनली ?

फुलनदेवीचे जिवन म्हणे बाईच्या जगण्याचं दुसरं टोक आहे. तिचे जिवन हे प्रचलित समाज व्यवस्थेला आरसा दाखवणारं आहे.

चंबळची डाकू राणी म्हणजे “फुलनदेवी”. फुलनदेवी वयाच्या ३३ वर्षी खासदार बनल्या. त्यांचा खासदार बनण्यापर्यंतचा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे. केवळ ३८ वर्षांच्या आयुष्यात फुलनदेवींनी जो संघर्ष केला. तो चित्त थरारक आहे. तितकाच विचार करायला लावणारा आहे. बाईचं बाईपण हिरावल्यानंतर बाई कोणत्या थराला जाऊ शकते, याचं ते एक उदाहरण आहे. फुलनदेवींचे जिवन हे मल्लाह आणि ठाकूर यांच्यातील वादाच्या भोवऱ्यात गुरफटे होते. त्यांची ओळख ठाकूरांची शत्रू अशी झाली होती. बाल विवाहामुळे, न शिकल्यामुळे जिवनाचे दुसरे टोक गाठायची वेळ त्यांच्यावर आली. एकूणच पर‍िवार, समाज,जातिव्यवस्था, सरकारी कर्मचारी, न्यायव्यस्थेच्या त्या शिकार बनल्या.

फुलनदेवींची जिवनगाथा म्हणजे समाज व्यवस्थेला विचार करायला लावणारी धगधगती आग आहे, असे म्हटले तर अतिशोक्ती होणार नाही.उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्हयातील गोरहा गावात १० ऑगस्ट १९६३ मध्ये फुलनदेवीचा जन्म झाला. मल्लाह म्हणजे मासेमारी करणारे किंवा होडी चालवणाऱ्या एका गरीब घरात जन्माला आलेल्या मुलीने हातात बंदूक घेतली. त्यानंतर फुलन डाकूराणी बनली. तिने स्वत: न्याय मिळवण्यासाठी २२ जणांची हत्या केली. अन्यायाचा बदला घेतला. तिचा हा प्रवास‍ खूपच संघर्षमय होता. जिवनातल्या एका वळणावर ती पोलिसांना शरण आली. त्यानंतर तिने तुरुंगवास भोगला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिच्या आयुष्याला एक वेगळे वळणं मिळालं. फुलनची मॅडम फुलनदेवी झाली. फुलनदेवी खासदार बनल्या.

हे सुद्धा वाचा

Phulandevi : सामान्य महिला असलेल्या फुलनदेवीवर डाकू होण्याची वेळ का आली ?

Shivsena : सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंची तिहेरी कोंडी, उद्धव ठाकरेंसाठी मात्र आशेचा किरण

Thackeray vs Shinde : ठाकरे शिंदे गटाचे भवितव्य उद्या

फुलनदेवींची “‍बँडिंड क्वीन” अशी ओळख मीडियाने जगाला करुन दिली. त्यांच्यावर २२ हत्या, ३० दरोडे, १८ अपहरणांचे आरोप होते. बेहमई हत्याकांडानंतर त्या सरकारला शरण आल्या. त्यांनी आपली बंदूक खाली ठेवली. त्यांना ११ वर्षांचा तुरूंगवास झाला. तरुंगवास भोगल्यानंतर फुलनदेवींना १९९४ मध्ये समाजवादी पार्टीच्या मुलायम सिंह यादव यांनी सर्व आरोपांतून मुक्त केले. त्यानंतर फुलनदेवी या ११ व्या लोकसभेच्या खासदार झाल्या. १९९६ ते २००१ या काळा त्या मिर्जापूर लोकसभेच्या खासदार होत्या.

फुलन म्हणजे फुलणे, विकसित होणे. उन्नति होणे. जसे की, फुलं उमलतं आणि त्याचा दरवळणारा सुगंध परिसर गंधीत करतो. त्यांच्या फुलन या नावाप्रमाणे त्यांच्या जिवनात उन्नतीचा एक टप्पा आला. सगळं कसं छान चाललं होतं. त्यांचा पुर्नजन्मच झाला होता. चंबळच्या डोंगर दऱ्यात फिरणारी, मिळेल ते खाणारी, सुख म्हणजे नक्की काय असतं हे माहित नसणारी मुलगी नवी दिल्लीमधील अशोका रोडवरच्या सुंदर बंगल्यात राहू लागली. ऐश्वर्य प्राप्त झालं आणि सुखात असतांना एक दिवशी शत्रूने घात केला. ऐन सणाच्या दिवशी त्यांचा शत्रू बनून आलेल्या ठाकूर शेरसिंह राणा याने फुलनदेवींना गोळी झाडून मारले. ही घटना २५ जुलै २००१ मध्ये घडली. त्या दिवशी नागपंचमी होती.

फुलनदेवीच्या एकलव्य संगठनमध्ये सामील होण्यासाठी त्या दिवशी ठाकूर शेरसिंह राणा त्यांना भेटायला त्यांच्या नवी दिल्ली मधील घरी आला होता. सण असल्यामुळे फुलनदेवींनी त्याला खीर खाऊ घातली. त्यानंतर तो जायला निघाला. त्यावेळी शेरसिंह राणाला सोडायला फुलनदेवी दारपर्यंत गेल्या. अलविदा म्हणत, काही कळायच्या आत शेरसिंह राणाने त्यांच्या वर गोळया झाडल्या. शेरसिंह राणाने बेहमई हत्याकांडाचा अशा प्रकारे बदला घेतला होता. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या २२ ठाकूरांना तिने बेहमईमध्ये गोळया झाडून ठार मारले होते. ते शेर सिंहचे नातेवाईक होते.

श्रीराम ठाकूर आणि लाला ठाकूर हे बाबु गुज्जरच्या हत्येमुळे फुलन देवीवर नाराज होते. बाबु गुज्जर हा डाकूंचा सरदार होता. तो फुलनदेवीवर फिदा होता. मात्र त्यावेळी विक्रम मल्लाहचे देखील तिच्यावर प्रेम जडले. त्यामुळे त्याने बाबू गुज्जरला संपवले. बाबू गुज्जरला संपण्याला कारण फुलदेवी असल्याचा राग श्रीराम ठाकूर आणि लाला ठाकूरच्या मनात होता. त्यामुळे त्यांच्या साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्याच बलात्काराचा बदला घेण्यासाठी तिने २२ ठाकूरांना मारले होते. त्यानंतर ती स्वत: डाकूंची सरदार बनली होती. त्याच २२ ठाकूरांच्या हत्येचा बदला शेरसिंह राणा याने फुलनदेवी खासदार झाल्यावर त्यांच्या घरी येऊ आशा प्रकारे घेतला.

बदल्याची भावना किती भयंकर असते. जाती व्यवस्था माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते. गरीबीचे आयुष्य आणि नवऱ्याने सोडलेल्या बाईकडे पाहण्याची समाजाची नजर असे एक ना अनेक पैलू फुलनदेवींच्या जिवनाशी निगडीत आहेत. ब्रिटनमधील‍ लेखक “रॉय मॉक्सहॅम” यांनी “आउटलॉ” हे फुलनदेवींच्या नावावर पुस्तक लिहिले आहे. ते म्हणता की, ती क्रुर होती, पण हसमुख होती. ती नेहमी हसत राहायची. ती चुकीच्या न्याय व्यवस्थेची शिकार बनली असेही, त्यांनी म्हटले आहे. रॉय यांनी अनेक वेळा त्यांना पत्र व्यवहार केला होता. ते दिल्लीला येऊन फुलनदेवींना भेटले होते. फुलनदेवी डाकुंच्या टोळीत स्वत: सामिल झाल्या की, त्यांना जबरदस्तीने नेण्यात आले. याचे उत्तर त्यांनी कधीच‍ दिले नाही. त्यांना या विषयावर कोणी प्रश्न विचारला तर “शायद किस्मत को यही मंजूर था” एवढं त्या सांगायच्या.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी