28 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रइंधन संपल्याने इंदापुरात कोसळले विमान, महिला वैमानिक जखमी

इंधन संपल्याने इंदापुरात कोसळले विमान, महिला वैमानिक जखमी

टीम लय भारी

इंदापूर : इंदापूर येथे एका शेतात विमान कोसळून अपघात झाला आहे. कार्व्हर एव्हिएशनचे हे विमान असून इंधन संपल्यामुळे ते कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात वैमानिक भाविका राहुल राठोड जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल शेळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले असून सदर घटनेचे फोटो सुद्धा पोस्ट केले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार या प्रशिक्षणाचा भाग म्हणून आज सकाळी बारामती येथून या विमानाने उड्डाण केले. उड्डाण घेत असताना अचानक विमानातील इंधन संपले त्यामुळे विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील रहिवासी बारहाते यांच्या शेतात कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात भाविका राठोड जखमी झाल्या. भाविका या कार्व्हर एव्हिएशनमध्ये सध्या त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करीत आहेत.

इंधन संपल्याने इंदापुरात कोसळले विमान, महिला वैमानिक जखमी

या अपघाताचे कळताच शेजारच्या पोंदकुले वस्तीतील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी भाविका राठोड यांना सुरक्षितपण बाहेर काढले. अपघातात महिला पायलट राठोड यांच्या पायाला किरकोळ जखमा झाल्या असून विमानाचे मात्र मोठे नुकसान झाले असून विमानाचे तुकडे झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बारामती येथील कारवार एव्हिएशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहे.

हे सुद्धा वाचा…

भांग, गांजा घेतल्यास बलात्कार, खून, दरोडे थांबतील, भाजप नेत्याचा अजब दावा

सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या नावे बनावट अध्यक्ष व सेक्रेटरींनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा 

आरे काॅलनीतील वाहतुक 24 तासांसाठी बंद, कारशेडच्या कामाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!