29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींचे मनमुराद ढोल वादन

नागपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींचे मनमुराद ढोल वादन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये विविध उपाययोजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. नागपूर दौऱ्यादरम्यान मोदींच्या स्वागतासाठी ढोलपथकाकडून ढोलवादन करण्यात आलं. यावेळी मोदींनीही ढोलवादन केलं.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये विविध उपाययोजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. नागपूर दौऱ्यादरम्यान मोदींच्या स्वागतासाठी ढोलपथकाकडून ढोलवादन करण्यात आलं. यावेळी मोदींनीही ढोलवादन केलं. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

पंतप्रधान मोदी आज सकाळीच नागपुरात दाखल झाले. यावेळी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. यावेळी नागपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांचं पारंपरिक पद्धतीनं ढोल वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही.

हे सुद्धा वाचा

खडसे यांच्या पत्नी पराभूत; जळगाव दूध संघात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण विजयी 

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी, महाजन यांचे पीए जळगाव दूध संघात विजयी; खडसे-महाजन यांची प्रतिष्ठा पणाला!

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल : नितीन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठीच्या नागपूर दौऱ्यावर ढोलवादन केलं. नागपूरच्या गजवक्र ढोल ताशा पथकाला नरेंद्र मोदींच्या स्वागताचा मान मिळाला होता. ढोल ताशाच्या निनादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत झालं. यावेळी पंतप्रधान मोदींनाही ढोलवादनाचा मोह आवरला नाही. पंतप्रधान मोदी यांचा ढोल वाजवतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. आज मोदींच्या हस्ते नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या 520 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी