30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रPM Modi : पुण्यातील एका फ्लॅटमध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा कट! पोलिसांकडून एकाला अटक

PM Modi : पुण्यातील एका फ्लॅटमध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा कट! पोलिसांकडून एकाला अटक

पोलीस नियंत्रण कक्षाला बनावट कॉल केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पुणे येथे एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा या व्यक्तीने फोनवरून केला होता.

सामान्य नागरिकांना कधीही कणत्याही अडचणीचा सामना करावा लागल्यास अथवा त्यांच्यासोबत कोणतेही बेकायदेशीर कृत्य घडत असल्यास तात्काळ मदत व्हावी यासाठी पोलिस नियंत्रण कक्ष कार्यरत असते. यासाठी फक्त नागरिकांना आपल्या मोबाईल फोनवरून टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा लागतो. खासकरून नागरिकांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या या सुविधेचा मात्र काही लोक गैरफायदा घेत असल्याचे आढळून येते. अनेकदा काही लोक या क्रमांकावर बनावट फोन करून चुकीची माहिती देत असतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा वेळ अनेकदा वाया जातो. अशीच काहीसी घटना घडली आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात. या प्रकरणात पुणे पोलिसांनी एका व्यक्तिला अटक देखील केली आहे.

पोलीस नियंत्रण कक्षाला बनावट कॉल केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पुणे येथे एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा आणि पुणे आणि मुंबई रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट एका फ्लॅटमध्ये रचला जात असल्याचा दावा या व्यक्तीने फोनवरून केला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी नैराश्याने ग्रस्त आहे आणि त्याच्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मुलांच्या आवाजाने तो अस्वस्थ झाला होता. तो शेजारील पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील देहू रोड भागातील रहिवासी आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, 4 ऑक्टोबर रोजी त्याने आपत्कालीन क्रमांक 112 वर कॉल केला आणि फ्लॅटमधील रहिवाशांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांना बनावट कॉल केला.

हे सुद्धा वाचा

Aryan Khan : शाहरुख-गौरीचा मुलगा करणार मनोरंजन क्षेत्रात डेब्यू; आर्यनच्या खांद्यावर विशेष जबाबदारी

MS Dhoni : भारताला पुढचा धोनी मिळाला? अगदी ‘माही’सारखाच केलाय सामना फिनिश

INDvsSA ODI : आफ्रिकेच्या ताकदीपुढे गब्बरचा संघ फेल; 9 धावांनी गमावला पहिला सामना

देहू रोड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “मनोज हंसे यांना 112 इमर्जन्सी लाइनवर कॉल आला. पंतप्रधान मोदींची हत्या आणि पुणे आणि मुंबई रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस तपासात हा फेक कॉल असल्याचे समोर आले आहे. त्याने सांगितले की, आरोपी औदासिन्य अवस्थेत होता आणि त्याच्या वरच्या फ्लॅटमधून आवाज येत असल्याने तो अस्वस्थ झाला होता.

पोलिस पथकाशी वाद
पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, आरोपींचा पोलीस पथकाशीही वाद झाला होता. आम्ही त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 177 (खोटी माहिती देणे), 353 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यात अडथळा आणण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळजबरी) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी