29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रPolice Officers Promoted : राज्यातील 23 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती!

Police Officers Promoted : राज्यातील 23 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती!

सेवा ज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात पोलिस अधिक्षक पोलिस उप अधिक्षक या पदांसाठी सदर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये तब्बल २३ पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस खात्यात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात पोलीस अधिक्षक पोलीस उप अधिक्षक या पदांसाठी सदर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये तब्बल 23 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे. सदर पदोन्नती ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णय व आदेश यांच्या आधीन राहून करण्यात आली असून त्याबाबत एक पत्रक काढून कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती पदोन्नती देण्यात आली आहे हे सुद्धा त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाच्या असून या तात्पुरत्या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकारी यांना नियमानधीनतेचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताच हक्क असणार नाही असे सुद्धा नमूद करण्यात आले आहे.

सदर पदोन्नती 23 पोलीस अधिकाऱ्यांना जाहीर करण्यात आली असून पोलीस अधिक्षक पोलिस उप अधिक्षक या पदांसाठी या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जयंत नामदेव बजबळे यांची मीरा- भाईंदर – वसई – विरार येथे पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पियुष विलास जगताप यांची यवतमाळ येथे अपर पोलीस अधिक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. बाबुराव भाऊसाहेब महामुनी यांची सुद्धा बुलढाणा येथे पोलिस अधिक्षक तर अश्विनी सयाजीराव पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस उपायुक्तपदी नेमणूक झाली आहे.

हे सुद्धा वाचा…

Chitra Wagh : भाजपने चित्रा वाघ यांना दिली मोठी जबाबदारी

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी राजकारणात करणार एंट्री

Maharashtra Politics : आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न सोडवा, सत्ताधाऱ्यांकडून सामंजस्याचे पाढे

तसेच शिलवंत रघुनाथ नांदेडकर यांची औरंगाबाद शहरात पोलीस उपयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रशांत अशोक सिंग परदेशी यांना पोलीस उप आयुक्त, मंत्रालय सुरक्षा, बृहन्मुंबई येथे नेमणूक करण्यात आली असून प्रिती प्रकाश टिपरे यांची पोलीस उपायुक्त डायल 112 नवी मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे. समीर नजीर शेख – पोलीस अधिक्षक, राज्य नियंत्रण कक्ष, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, राहुल ज्ञानदेव मदने – पोलीस उपायुक्त, नागपूर शहर, रीना यादवरावजी जनबंधू यांना अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर येथे नेमणूक झाली आहे.

अश्विनी परमानंद पाटील – उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, अमोल विलास गायकवाड – समादेशक, भारत राखील बटालियन क्र. 2, गोंदिया, कल्पना माणिकराव भराडे – प्राचार्य अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर, ईश्वर मोहन कातकडे – अपर पोलीस अधिक्षक – भंडारा, प्रितम विकास यावलकर पोलीस अधिक्षक, सायबर सुरक्षा महाराष्ट्र राज्य, मुंबई, अर्चना दत्तात्रय पाटील – पोलीस अधिक्षक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई, दत्ता लक्ष्मण तोटेवाड – अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) यांचे स्टाफ ऑफिसर, महाराष्ट्र राज्य, शीतल सुरेश झगडे – उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे.

पंकज नवनाथ शिरसाठ यांची सुद्धा उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे. नवनाथ ठकाजी ढवळे – पोलीस उपायुक्त ठाणे शहर, रत्नाकर ऐजीनाथ नवले – उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई तर सागर रतनकुमार कवडे यांची सुद्धा पोलिस अधिक्षक, दहशतवादी विरोधी पथक, मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान दीपक विठ्ठलराव गिऱ्हे (पोलिस उपायुक्त औरंगाबाद), अनिकेत गंगाधर भारती (अपर पोलिस अधिक्षक, भंडारा), खंडेराव आप्पा धरणे (अपर पोलिस अधिक्षक, यवतमाळ) यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.

पोलिसांच्या बदल्यांबाबतचा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने आणि पोलीस आस्थापना मंडळ क्र. 1 यांच्या शिफारशीचा यथायोग्य विचार करूनच महाराष्ट्र पोलिस अधिनियम (1951 चा 22) यानुसार निर्दिष्ट सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेनेच बदलीचे आदेश काढण्यात आलेले आहेत. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण/ न्यायालयीन आदेश, निवडणुकीची आचार संहिता, कायदा व सुव्यवस्था इ. बाबी लक्षात घेत या बदलीबाबत आदेश काढण्यात आलेले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी