32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमातंग व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत न्यायला विरोध, ग्रामपंचायतीसमोरच केले दहन

मातंग व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत न्यायला विरोध, ग्रामपंचायतीसमोरच केले दहन

 

टीम लय भारी

माळशिरस : सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव येथील घटना आहे. गावातील सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचा मृत्यू झाला. परंतु मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यासाठी चक्क गावगुंडांनी अडवणूक केली आहे (police restricted dead body of a villager to burn common crematory). मृत व्यक्ती दलित (मातंग) असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मृत व्यक्तीचा मृत्यू रात्री 2 च्या सुमरासच झाला होता परंतु गावातील काही लोकांनी पोलिसांकरवी मृतदेहाच्या नातेवाईकांना गावातील स्मशानभूमीत जाण्यापासून रोखले.

गोपीचंद पडळकर यांच्या ‘य़ा’ घोषणेमुळे महादेव जानकरांविषयीची जागी झाली आठवण

राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक संस्थेचे सी टी रवी यांच्या शुभहस्ते उदघाटन

प्रेतासोबत मातंग स्त्रिया सुद्धा रस्त्यावर त्यांच्या देवाचा धावा करत बसलेल्या दिसतात. मृतदेहावर शेवटचे व धर्माज्ञेनुसार हक्काचे संस्कार होत नाहीत पाहून स्त्रियांनी गणवेशधारी पोलिसांसमोर उर बडवून घेतला. परंतु कायमच हात दगडाखाली असलेल्या पोलिसांना सुद्धा फोनमधून नजर वर उचलायची उसंत नव्हती.

गाडी बंद आहे, चालू होत नाही अशी उडवाउडवीची कारणं देणाऱ्या पोलिसांना प्रेतयात्रेतील काही तरुणांनी चावी मागितली. त्याचबरोबर ग्रामपंचायतीत तक्रार करू असेही बजावले. परंतु निर्ढावलेल्या पोलिसांवर कसलाच काहीच परिणाम झाला नाही.

Police
महाराष्ट्र पोलीस

गावगुंडांनी मारहाण केल्याने मयत कुटुंबातील मातंग व्यक्तींनी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. तोच राग मनात ठेवून गावातील काही लोकांनी प्रेतयात्रा रोखली आहे.

आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंचतारांकित संधी

Supporting Taliban on Social Media: Police

आजच्या पुरोगाम्यांच्या महाराष्ट्रात जातीयवाद ठासून भरला आहे, प्रशासन न्याय देत नाही, जनता न्याय देईल का असा प्रश्न मयत दिव्यांग व्यक्तीच्या महिला नातेवाईकाने केला आहे.

उपाशी उन्हात बसलेली लहान मुले, शिणून गेलेल्या स्त्रिया आणि उघड्यावर सडत पडलेलं प्रेत अशी केविलवाणी अवस्था माळशिरस येथे दिसून आली.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी