30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रPoliceAction : सोशल मीडियात मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणाऱ्या अंध भक्ताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

PoliceAction : सोशल मीडियात मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणाऱ्या अंध भक्ताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टीम लय भारी

जामखेड : ‘ मुस्लीम समाजाकडून भाजीपाला व कसलाही माल विकत घेऊ नका. तुम्ही तुमचा मृत्यू विकत घेत आहात लक्षात ठेवा ’ असा धार्मिक विद्वेष पसरविणारा संदेश वॉट्सअपवर टाकणे अंधभक्ताला चांगलेच अडचणीत आणणारे ठरले आहे. या धर्मांध व्यक्तीला जामखेड पोलिसांनी बेड्या ( PoliceAction ) ठोकल्या आहेत.

बीडच्या आष्टी तालुक्यातील पोखरी येथील रहिवासी असलेल्या एकनाथ शिंदे या समाजकंटकाने वॉट्सअपवर धार्मिक विद्वेष पसरविणारा संदेश प्रसारित केला होता. ‘प्रिन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य’ या ग्रुपवर प्रस्तुत पोस्ट शिंदे याने टाकली होती. सोबत व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. ‘कुठल्याही मुस्लिम लोकांकडून भाजीपाला व कसलाही माल विकत घेऊ नका. तुम्ही तुमचा मृत्यू विकत घेत आहात. लक्षात ठेवा.’ असे या संदेशात म्हटले होते.

व्हिडीओमध्ये मुस्लिम समाजाचे दोन युवक हे फळ विक्रीच्या हातगाडीवर फळे लावत आहेत. त्यातील एक इसम हा प्रत्येक फळाला बोटाने थुंका लावत असल्याचे दाखविण्यात आले आहे. जाणीवपूर्वक मुस्लीम समाजाबद्दल जनमाणसांमध्ये विद्वेष पसरविल्याचा हा प्रकार याच ग्रुपमधील सदस्य असलेल्या अन्सार नवाब पठाण ( वय २८ वर्षे ) यांच्या निदर्शनास आला. पठाण यांनी ही बाब जामखेड पोलिसांच्या ( PoliceAction ) निदर्शनास आणून दिली. त्यावर पोलिसांनी कडक कारवाई करीत शिंदे याला अटक केली आहे.

सोशल मीडियातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याबरोबरच शासनाने कोविड 19 संदर्भात खोट्या अफवा पसरू नयेत असे आदेश दिलेले आहेत. तरी देखील त्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी अन्सार पठाण यांच्या फिर्यादीवरून एकनाथ शिंदे या समाजकंटकाविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह अन्य कलमान्वये ( PoliceAction ) गुन्हा दाखल केला आहे.

डीवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या टीमने वेगवान तपास ( PoliceAction )  करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. पुढील तपास हेड काँस्टेबल नवनाथ भिताडे हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : मोदी समर्थकांचा कळस : शिवराय, महात्मा गांधीं, डॉ. आंबेडकरांच्या कार्यासोबत ‘मेणबत्त्या इव्हेन्ट’ची तुलना

Covid19 : ‘टाळ्या वाजवणे, दिवे लावायला सांगणे हे पंतप्रधानांचे काम आहे का ?’

Coronavirus : अजितदादांचे आवाहन, मेणबत्ती – दिवे पेटवताना सॅनिटायझरमुळे हात भाजून घेऊ नका

‘कोरोना’ व्हायरसबाबत केंद्र सरकारने जारी केलेली माहिती

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!