महाराष्ट्र

Politics : विरोधकांचा हा रडीचा डाव : सुप्रिया सुळेंच्या बनावट ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

टीम लय भारी

पुणे : शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या ‘आयडिया’ लढवत (Politics) आहेत. या सगळ्या गडबडीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आवाजातील एक बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली. मात्र सुप्रिया सुळे यांनी तात्काळ फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून याबाबत खुलासा केला आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे या चव्हाण यांच्याविरोधात प्रचार करत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाने फेक मोबाइल नंबरही शेअर केला जात आहे. त्याद्वारे ही क्लिप शेअर केली जात आहे. सुप्रिया सुळे यांनी या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, ‘मला माझ्या काही सहका-यांचे तसेच वर्तमानपत्र व चॅनेलमधून फोन आले. उस्मानाबाद आणि लातूरच्या काही भागामध्ये माझ्या नावाचा, आवाजाचा आणि खोटा मोबाइल नंबर वापरून व लिहून काही लोक प्रचार करत आहेत. त्याचा गैरवापर होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात इतकी पातळी सोडून विरोधक प्रचार करत आहेत, हे खरेच दुर्दैवी आहे. मी तातडीने पोलीस यंत्रणेची मदत घेतलेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाशीही संपर्क साधलेला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनाही मी तातडीने संपर्क साधलेला आहे. विरोधक जो रडीचा डाव खेळत आहेत, त्याची कल्पना मी सतीश चव्हाण यांना दिली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

20 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

20 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

21 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

21 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

21 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

23 hours ago