27 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरमहाराष्ट्रGramPanchayat Election : पालघर जिल्ह्यात ६३ ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान

GramPanchayat Election : पालघर जिल्ह्यात ६३ ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान

पालघर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या पालघर, तलासरी, वसई आणि वाडा तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या असून 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

पालघर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या पालघर, तलासरी, वसई आणि वाडा तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या असून 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये सर्वाधिक 32 ग्रामपंचायती या पालघर तालुक्यातील आहेत. तर तलासरी तालुक्यात फक्त एका ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. थेट सरपंच पदाच्या उमेदवारीमुळे या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या. पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतीच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात पार पडत आहेत. यामध्ये वसई येथील 15 ग्रामपंचायती, पालघर येथील 32 ग्रामपंचायती तलासरी येथील एका ग्रामपंचायतीमध्ये व वाडा येथे पंधरा ग्रामपंचायती मध्ये या निवडणुका पार पडणार आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार पालघर जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण अलीकडेच जाहीर झाले. यामध्ये पालघर तालुक्यातील 38 तर वसई तालुक्यातील 8 ग्रामपंचायतमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे. तर इतर सहा तालुक्यांमध्ये आरक्षण अनुसूचित जमातींसाठी कायम राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अलीकडेच 362 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या गेल्या. त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत साठी हा कार्यक्रम जाहीर केला गेला आहे.
हे सुद्धा वाचा :

GramPanchayat Election : राज्यात 7,751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू

Sanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय राऊतांची जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया!

T20 World Cup : टी 20 विश्वचषकाचा पहिला फायनलिस्ट फिक्स!

डिसेंबरला होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांच्या नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्णपणे संगणक प्रणाली द्वारे राबविण्यात यावी असे निवडणूक आयोगाने काढलेल्या निवडणूक कार्यक्रम पत्रात म्हटले आहे. 18 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस तहसीलदारांमार्फत तालुकास्तरावर प्रसिद्ध करण्यात येईल. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) स्वीकारले जातील. 5 डिसेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना 7 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. पात्र उमेदवारांना त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप केले जाईल. 18 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!