29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आणखी एक जिल्हा निर्माण होण्याची शक्यता

महाराष्ट्रात आणखी एक जिल्हा निर्माण होण्याची शक्यता

टीम लय भारी

नाशिक : आजपासून महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचा दौरा करणार आहेत. आज (दि. २९ जुलै २०२२) ते नाशिक जिल्ह्यापासून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पण याचवेळी मुख्यमंत्र्यांकडून मालेगावकरांना एक भेट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मालेगावची जिल्हा (district) म्हणून घोषणा करण्यात येऊ शकते. अशी माहिती माजी कृषी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दादा भुसे यांनी दिली आहे.

तब्बल ४० वर्षांपासून मालेगाव वासीयांकडून मालेगाव तालुक्याचे जिल्ह्यात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. पण अद्यापही एकाही सरकारने यावर कोणताही निर्णय घेतला नाही. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची घोषणा करू शकतात असे सूतोवाच दादा भुसे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांकडून या दौऱ्यात मालेगाव जिल्हा निर्मितीचा सकारात्मक निर्णय घेण्यात येऊ शकतो.

या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आपल्या दौऱ्याची सुरुवातच नाशिकपासून करणार असल्याने एकनाथ शिंदे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जर मालेगाव तालुक्याचा जिल्हा करणार असल्याचे घोषित केले तर राज्यात आणखी एका जिल्ह्याची निर्मिती होईल (Possibility of creation of another district in Maharashtra). आणि यामुळे नाशिक जिल्ह्याचे सुद्धा विभाजन होईल.

हे सुद्धा वाचा :

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

खरंच…. कोरोना लस घेतल्यास 5000 रुपये मिळणार?

खासदार भावना गवळींच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला शिवसेनेत प्रवेश

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!