33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रHar Har Mahadev Movie : :...म्हणून पब्लिसिटीसाठी हे घडवूण आणले जात आहे;...

Har Har Mahadev Movie : :…म्हणून पब्लिसिटीसाठी हे घडवूण आणले जात आहे; हर हर महादेव चित्रपटाच्या वादावर शरद पोंक्षे यांची कॉमेंट

चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाल्यानंतर लोकांना हे कस सुचत? सत्ता गेलेली आहे, म्हणून पब्लिसिटीसाठी हे घडवून आणण्यात येत आहे, असा आरोप यांवेळी शरद पोंक्षे यांनी केला आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाल्यानंतर लोकांना हे कस सुचत? सत्ता गेलेली आहे, म्हणून पब्लिसिटीसाठी हे घडवून आणण्यात येत आहे, असा आरोप यांवेळी शरद पोंक्षे यांनी केला आहे. हिंदू महासभेच्या वतीने शरद पोंक्षे यांना पंढरपूर येथे क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदूत्व शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पोंक्षे बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, सिनेमा चालू असतात लोकांना मारणं हा हलकटपणा आहे. तुम्ही गुंड आहात का? या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर सिनेमा बघणाऱ्यांना नाही का? असा सवाल अभिनेते शरद पोंक्षे विचारला.
शरद पोंक्षे म्हणाले, हा मुर्खपणा आहे. सिनेमा सेन्सॉर झाला आहे. मी त्या चित्रपटात काम केले आहे. सेन्सॉरला आमच्या दिग्दर्शकांनी पुरावे दिले आहेत. चित्रपटात इतिहासाची कोणतीही मोडतोड झालेली नाही. याबाबत आक्षेप घेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना चित्रपटाचे दिग्दर्शक भेटणार आहेत. अभिजित देशपांडे यांनी अभ्यास करुन चित्रपटाची पटकथा लिहिली आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.
हे सुद्धा वाचा:
Devendra Fadanvis : ‘राजकारणातील कटुता दूर करायची असेल तर सर्वांना एक व्हावं लागेल’; फडणवीसांचे सुचक विधान

Uddhav Thackeray : ‘त्याला पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं’; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

IND vs ENG : सेमी फायनल सामन्यांत रोहित खेळणार की नाही? स्वतः दिली मोठी अपडेट

आगामी ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ आणि सध्या प्रदर्शित झालेल्या अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटांवरून मोठा वाद पेटला आहे. या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड झाल्याचा आरोप केला जात आहे. त्याचे राज्यभरात पडसाद पडत आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटांबाबत आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील चित्रपटगृहात जावून चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी प्रेक्षकांना मारहाण झाल्याबद्दलची तक्रार पोलिसांत दाखल झाली असून गुन्हे देखील दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे मनसेने या चित्रपटाला पाठिंबा दिल्याचे देखील ठाण्यात दिसून आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी