28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रप्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंवर तीक्ष्ण वार !

प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंवर तीक्ष्ण वार !

टीम लय भारी 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित शेतकरी मेळावा व कर्तृत्ववान नागरिकांच्या सन्मान सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी म्हटलं की, ज्यावेळी मी जलसंधारण सचिव होतो  त्यावेळी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून माणमध्ये ७५ कोटी रुपयांचे सिमेंट बंधारे मंजूर केले होते. जामीनाची चिंता व्यासपीठावरून पळून जाणाऱ्यांनी करावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. prabhakar-deshmukh-criticize-jaykumar-gore

कामाचा मी कधीही गाजावाजा केला नाही.  लोकप्रतीनिधीचे हेच कर्तव्य आहे. विरळी खोऱ्याचं हक्काचं टेंभूचं पाणी विरळीला निश्चितपणे मिळेल आणि ते आम्हीच आणणार असून महाविकास आघाडीच माणचा संपूर्ण पाणीप्रश्न सोडवेल आहे.Maha Vikas aghadi solve water problem

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, माजी सभापती श्रीराम पाटील, संजय जाधव, दादासाहेब मडके, संजय जगताप, बाळासाहेब काळे, प्रशांत विरकर, विक्रम शिंगाडे, सिध्देश्वर काळेल, संजय खिलारी, रामभाऊ झिमल, विजय जगताप, मधुकर झेडगे, अंकुश गाढवे, शरद काळेल आदी मान्यवर उपस्थित होते. prabhakar-deshmukh-criticize-jaykumar-gore

प्रभाकर देशमुख आपल्या भाषणात म्हणतात की, (कै.) सदाशिवराव पोळ, (कै.) खाशेराव जगताप यांच्यात मतभेद होते मात्र या दोघांनी सुध्दा एकमेकांचा सन्मान ठेवून समाजासाठी भरपूर कामे केली आहे.

मात्र आपले लोकप्रतिनिधी माण तालुक्याच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्य करत आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, पाणी यावर त्यांनी बोललं पाहिजे पण ते बोलत नाहीत.

हे सुध्दा वाचा

Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…

शिवसेनेने आमदार जयकुमार गोरेंना झोडपले

नाणार प्रकल्प येणार कि जाणार ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी