26 C
Mumbai
Thursday, February 2, 2023
घरमहाराष्ट्रIAS, IPS दुष्काळी भागात घडणार; प्रभाकर देशमुखांचा कल्पक उपक्रम!

IAS, IPS दुष्काळी भागात घडणार; प्रभाकर देशमुखांचा कल्पक उपक्रम!

कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानदेशाला माणच्या मातीने प्रतिकुल परिस्थितीशी झगडण्याची, तिच्यावर मात करण्याची ताकद दिली आहे. त्यामुळेच माण तालुक्याला बुद्धीवंतांची खाण, आपला माण म्हटले, तर वावगे ठरणार नाही, असे सांगतानाच या मातीतून भावी काळात देखील आयएएस, आयपीएस घडतील असा विश्वास सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.

कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानदेशाला माणच्या मातीने प्रतिकुल परिस्थितीशी झगडण्याची, तिच्यावर मात करण्याची ताकद दिली आहे. त्यामुळेच माण तालुक्याला बुद्धीवंतांची खाण, आपला माण म्हटले, तर वावगे ठरणार नाही, असे सांगतानाच या मातीतून भावी काळात देखील आयएएस (IAS) आयपीएस (IPS) घडतील असा विश्वास सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी व्यक्त केला.

दहिवडी कॉलेज येथे स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभाकर देशमुख बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. टीएस साळुंखे, उपप्राचार्य डॉ. ए. जे. बरकडे, दहिवडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती महेश जाधव उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. अशा या दुष्काळी परिस्थितीतील तालुक्यातून अनेक बुध्दिवंतांची परंपरा जोपासली आहे. अनेक अधिकारी येथे घडले. अतिषय प्रतिकुल परिस्थितीत या विद्यार्थ्यंनी शिक्षण घेवून यशाला गवसणी घातली आहे. यापुढे देखील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, अधिकाधिक विद्यार्थी या केंद्रातून घडावेत यासाठी आम्ही मदत करू, अगदी पुण्या मुंबईतील सुविधा येथे उपलब्ध करुन देऊ.

या कार्यक्रमात बोलताना स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या कोमल साळुंखे म्हणाल्या, घरच्यांची माझ्यासाठी लगबग हीच माझ्यासाठी उर्जा देणारी ठरली. प्रशांत अवघडे याने स्वत:वर बंधने घातली, शिस्त लावली, कष्ट घेतले अन त्यानंतर सातत्याने यशाला गवसणी घातल्याचे सांगितले. अनिकेत भुजबळ याने पोशाखी सेवेचे वेड असल्यामुळे सेवेत सुरू झालो. मात्र या क्षेत्रात प्रगती करुन उच्च पद प्राप्त करण्याचे धेय्य असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा :

Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !

Uddhav Thackeray : ‘ज्यांना आपलं भविष्य माहिती नाही ते महाराष्ट्राचं भविष्य ठरवायला निघाले आहेत’

Eknath Shinde : कामाख्या देवीला रेड्याचे बळी देतात का ?, एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐका!

प्रभाकर देशमुख हे माण तालुक्याचे सुपुत्र म्हणून तालुक्याच्या कृषी, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत आले आहेत. आपल्या प्रशासकीय सेवेत देखील त्यांनी आपल्या कामाने वेगळी ओळख निर्मान केली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी माण तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात देखील त्यांचे योगदान राहिले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ नयेत, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!