32 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरमहाराष्ट्रVideo : निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का;...

Video : निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. याप्रकरणी अनेक सुनावण्या पार पडल्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला सोपविले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षांतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे का असा सवाल उपस्थित करत, उद्धव ठाकरे या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात गेल्यास त्यांना न्याय मिळेल असे म्हटले आहे. (Prakash Ambedkar’s reaction to the decision given by the Election Commission of Shiv Sena)

हे सुद्धा वाचा

पुण्यात ठाकरे-शिंदे गटामध्ये राडा; पोलिसांची धावाधाव

निवडणूक आयोग मोदींचे गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीबाहेर ओपन कारमधून भाषण

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धवजी सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी