30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्र"निर्लज्जासारखं हसताय...जनता धडा शिकवेल; सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

“निर्लज्जासारखं हसताय…जनता धडा शिकवेल; सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

अखेर 11 महिन्यांच्या चढाओढीनंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. तुर्तास शिंदे यांचे शिवसेना-भाजप सरकार बचावले आहेत. शिंदे गटाचा व्हिप बेकायदेशीर असूनही निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस समर्थकांनी अर्धे युद्ध जिंकल्यासारखा जल्लोष साजरा केला. दरम्यान या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजुने लागला असून हा लोकशाहीचा विजय आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. शिंदे-फडणवीसांच्या वागणूकीवर सर्वस्तरातून टिका करण्यात येत आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“शिंदे गटाचा व्हिप बेकायदेशीर होता आणि राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना विश्वासदर्शक ठराव घेण्यास सांगणं, हेही बेकायदेशीर कृत्य होतं, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. तरीही न्यायालयाने त्यांना (एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस) खुर्चीवरून हटवलं नाही, त्यामुळे ते निर्लज्जासारखं हसतायत. पण येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल, यात काही शंका नाही,” असं ट्वीट करत वकील प्रशांत भूषण यांनी संताप व्यक्त केला आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढतं, शिंदे गटाने नेमलेले भरत गोगावले हे व्हीप बेकायदेशीर असल्याचंही सांगितलं. याचसोबत उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार कदाचित परत आलं असतं, असं मतही सुप्रीम कोर्टाने मांडलं आहे. मुख्यत: 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी ठराविक कालावधीमध्ये घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता काय निकाल देतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे

हे सुद्धा वाचा :

शिंदे सरकारवर अद्यापही 16 आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार; निर्णय अध्यक्ष महोदयांकडे!

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर खापर फोडणे ही कोर्टाने शोधलेली पळवाट !

झाल्या त्या गोष्टी झाल्या आता जोमाने काम करु ; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रीया

Prashant Bhushan angry tweet on Shinde Fadnavis press conference

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी