30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रप्रवीण दरेकरांची मविआ सरकार टीका; हा फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार

प्रवीण दरेकरांची मविआ सरकार टीका; हा फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार

टीम लय भारी

मुंबई :- विधिमंडळाच्या दुसऱ्या आणि अंतिम अधिवेशनाच्या कामकाजावर भाजपने बहिष्कार टाकला आहे. यानंतर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवली. मात्र, यावर आक्षेप घेत, विधीमंडळाच्या मार्शलमार्फत भाजपचे माईक, स्पीकर काढून घेण्यात आले. ही सरकाराची मनमानी आहे, एक प्रकारे लोकशाहीचा खून आहे, हा फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार आहे अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सरकारवर केली आहे (Praveen Darekar has criticized the government saying that it is only a form of muscat pressure on the opposition).

हा विषय विधानपरिषेदत उपस्थित झाल्यानंतर यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर बसून प्रतिविधानसभा भरवावी लागते. तरीही या  प्रतिविधानसभेच्या कामकाजावर सुरक्षा रक्षकांमार्फत कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतात. हे किती दुर्दैवी आहे. फक्त हा विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार आहे अशी टीका प्रवीण दरेकरांनी सरकारवर केली आहे (Praveen Darekar has criticized the government saying that this is just a form of muscat pressure on the opposition).

बाळासाहेब थोरातांनी सभागृहात मांडली शेतकरी हिताची तीन विधेयके

मंत्री अशोक चव्हाणांचा भाजपवर वर्मी घाव

महाविकास आघाडी सरकार दडपशाही करण्याचे काम करत आहे, असे म्हणत दरेकरांनी ट्विट केले. ट्विटमध्ये ते म्हणाले की, मविआ सरकारने सभागृहात दडपशाही केल्यामुळे भाजपच्या आमदारांनी आज विधानभवन परिसरात अभिरुप विधानसभा भरवली! परंतु त्याठिकाणी देखील दडपशाही करण्याचं काम मविआ सरकारने केलं. असे हॅशटॅग MonsoonSession असे प्रवीण दरेकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

लोकशाही प्रक्रियेनुसार विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात प्रतिविधानसभा भरविली. त्यामध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आपण कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही, तरीही सरकारने हुकुमशाही करीत विधीमंडळाच्या मार्शलमार्फत आमचे माईक, स्पीकर काढून घेतले. तसेच विधानभवनाच्या सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देणे ही सरकाराची मनमानी आहे. हा एका प्रकारे लोकशाहीचा खून आहे, या शब्दात विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Maharashtra Monsoon Session: Devendra Fadnavis leads BJP protest at Vidhan Bhavan against suspension of 12 MLAs, holds mock session outside Assembly

भाजपाच्या 12 सदस्यांच्या निलंबन प्रकरणाच्या चौकशीमध्ये सत्य नक्कीच बाहेर येईल. माइक आणि स्पीकर काढून घेऊन विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही. विरोधी पक्षांचे सदस्य विधानसभा कामकाजात सहभागी होत नसतील तर कामकाज स्थगित करता येते. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये विरोधी पक्ष उपस्थित नसेल तर त्या कामकाजाला महत्व नसते. कारण लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये विरोधी पक्षालाही तितकेच महत्व आहे. असे दरेकर म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी