29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमान्सूनपूर्व पाऊस राज्याला तडाखा देणार !

मान्सूनपूर्व पाऊस राज्याला तडाखा देणार !

राज्यात मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी हवामान विभागाकडून मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी पुढील दोन-चार दिवस वाळवाच्या पाऊस होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घटून सध्याच्या उकाड्यातून काहीसा दिलासा मिळू शकतो.

मान्सूनचा पाऊस अजून सुरू झालेला नाही. त्याला काहीसा अवकाश असला तरी तत्पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस राज्याला तडाखा देणार आहे. हवामान विभागाने (आयएमडी) तसा अंदाज वर्तवला आहे. राज्यात काही ठिकाणी पुढील दोन-चार दिवस वाळवाच्या पाऊस होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घटून सध्याच्या उकाड्यातून काहीसा दिलासा मिळू शकतो.

राज्यात मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी हवामान विभागाकडून मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसाही
गेल्या आठवडाभरात राज्यात बऱ्याच ठिकाणी वाळवाच्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यातून दिलासा मिळत आहे.

पुणे आयएमडीचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अन् मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. पुण्याला बुधवारी सायंकाळीही टपोऱ्या गारांसह मुसळधार पावसाने झोडपून काढले. राज्यातील अनेक जिल्ह्यात वाळवाच्या पावसामुळे 2-4 दिवसात तापमान 2 ते 3 अंशांनी घटलेले आहे. मात्र, अजूनही काही जिल्ह्यात तापमान चाळीशीच्या वर आहे. नाशिक, पुणे, सांगली व सातारा या नेहमी तुलनेने थंड राहणाऱ्या शहरातही गेले काही दिवस तापमान कमालीचे वाढले आहे. त्यामुळे उकाडाही मोठ्या प्रमावार जाणवत आहे. दुसरीकडे, हवेतील आर्द्रता कोकण पट्ट्यातही वाढली आहे.

गेल्या 24 तासात, परभणीत राज्यातील सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. कोल्हापूर 38°C, बारामती 38.3, नाशिक 38.4, सातारा 38.6, पुणे 39.2, उद्गीर 39.8, सांगली 40.2, नांदेड 41.2, बीड 41.9, जेऊर 42, सोलापूर 42.2 आणि जालना 42.3°C अशी तापमानाची नोंद झाली. गेल्या 24 तासात पुण्यातील डुडुळगाव आणि चिंचवड परिसरात 50 मिमी पावसाची नोंद झाली. पुणे व परिसरात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस झाला.

राज्यात यलो, ऑरेंज अलर्ट

पालघर, ठाणे आणि मुंबई वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यात बीड आणि जालना वगळता, येत्या 24 तासात पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भ-मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, अमरावती, लातूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, कोल्हापूर, संभाजीनगर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोकणात अनेक ठिकाणी वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाने हजेरी लावली. मंगळवारी (30 मे) सिंधुदुर्गात जोरदार वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मुसळधार पावसाने हवेत निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा मिळाला. महाराष्ट्रात मान्सून पोहोचायला अद्याप आठवडा लागण्याचा अंदाज आहे. मात्र, पुणे व कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. परभणी, वाशिम जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस मुसळधार बरसला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना काही ठिकाणी दिलासा मिळाला. मात्र, परभणीत राज्यातील सर्वाधिक तापमान नोंद होण्याइतपत उष्मा वाढला.

हे सुद्धा वाचा :

गुड न्यूज | मान्सून 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात पोहोचणार

आयटी इंजिनियर तरुणी आई-भावासह बेंगळुरू दर्शन सहलीला निघाली अन् जीवच गमावून बसली !

तुमच्या भागात वीज पडणार असल्याची माहिती देणार दामिनी अ‍ॅप

हा मान्सूनपूर्व पाऊस काही भागातील शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीला वेग येईल. मात्र, काही ठिकाणी या पावसाने बागायतदारांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. कोकणातील आंबा पिकाला या अवकाळी पावसाने शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यातही शेतमालाचे बरेच नुकसान केले.

 

PreMonsoon Rain in Pune, IMD Forecast, Maharashtra Rain, Yellow Alert, Orange Alert

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी