29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रGanpatichi Aarti : आरतीमधील चुकीच्या शब्दांच्या उच्चारामुळे आरतीचा भावार्थ बदलतो

Ganpatichi Aarti : आरतीमधील चुकीच्या शब्दांच्या उच्चारामुळे आरतीचा भावार्थ बदलतो

गणपती बाप्पांच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यांतील गणेश चतुर्थीला आपल्याकडे गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. गणपतीला आवडणारे जास्वंदीचे लाल रंगाचे फूल आणि २१ दूर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात.

गणपती बाप्पांच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यांतील गणेश चतुर्थीला आपल्याकडे गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. गणपतीला आवडणारे जास्वंदीचे लाल रंगाचे फूल आणि २१ दूर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात. तसेच २१ मोदकांचा नैवेदय दाखवला जातो. उकडीचे मोदक बाप्पाला आवडतात. तसेच दररोज सकाळ संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती महाराष्ट्रात सगळीकडे म्हटली जाते. टाळ, झांज, मृदंग, हरमोनियम याच्या तालावर गणपतीची आरती केली जाते. घरोघरी तसेच गणेश मंडळे ही आरती मोठया भाव भक्तीने गातात.  परंतु ही आरती गात असतांना अनेक चुका होतात. त्या चुका टाळता आल्या पाहिजेत.

कारण प्रत्येक अक्षराला प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. त्या अर्थांतून एक भाव व्यक्त होत असतो. तो भाव देवापर्यंत पोहोचला पाहिजे. हे आरती करण्यामागचे एक कारण आहे. मात्र शब्दांच्या चुकीच्या उच्चारामुळे आरतीचा अर्थ बिघडतो. त्या चुका कोणत्या ते पाहू या.

‘सुखकर्ता दु:खहर्ता’ या आरतीमधील चुका:

बरेच जण ओटी शेंदुराची असा उल्लेख करतात. तो ओटी नसुन उटी शेंदुराची उटी म्हणजे लेप गणपतीला लाल रंगाच्या शेंदुराचा लेप लावलेला असतो. आपल्या राज्यातील प्रत्येक अष्टविनायकाचा रंग हा शेंदरी आहे. कारण त्याने शिंदुर लेपन केले आहे. ओटी ही देवीची भरली जाते.

दुसरा चुकीचा शब्द उच्चारला जातो तो म्हणजे वक्रतुंड त्रिनेमा तो शब्द असा आहे, वक्रतुंड त्रिनयना गणपतीचे तोंड म्हणजे सोंड आहे. त्यामुळे तो आपल्या सोंडेची हवी तशी हलचाल करु शकतो म्हणून त्याला वक्रतुंड हे नाव आहे. गणपतीला तीन डोळे आहेत म्हणून त्याला त्रिनयना असे म्हणतात. गणपती तसेच त्यांचे प‍िता महादेव यांना तीन डोळे आहेत. दोन डोळे दिसतात आणि एक डोळा हा कपाळावर असतो. तो दिसत नाही. दोन डोळे बंद केले की, जे समोर दिसते ते तिसऱ्या डोळयांने दिसते. तिसऱ्या डोळयांनी केवळ ध्यानमग्न व्यक्तीच पाहू शकते. दास रामाचा वाट पाहे सजणा हा शब्द चुकीचा असून, दास रामाचा वाट पाहे सदना असा आहे. मी देवाचा भक्त रामाचा दास तुझी सदन म्हणजे घरी वाट पाहत आहे असा अर्थ आहे.

हे सुद्धा वाचा

Ashtavinayak : लेण्याद्रीचा गिरजात्मक गणेश ‘सहावा’ विनायक

VIDEO : अष्टविनायक दर्शन : तिसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक

अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती भक्तांचे विघ्न हरण करणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’

आता शंकराच्या आरतीमध्ये होणाऱ्या चुका पाहू यात. लवलवती विक्राळा असे नसून, लवथवती विक्राळा म्हणजे या ठिकाणी शंकराचे विराट रुप डोळयासमोर ठेवले आहे. जशा आगीच्या ज्वाळा असतात तसेच हे शिवाचे भयंकर रुप आहे. तेजस्वी रुप हे ते डोळयांनी पाहतांना आक्राळ विक्राळ द‍िसते. तर ओवाळू आरत्या सुरवंटया येती असे नसुन, ओवाळू आरत्या कुरवंटया येती असे आहे. तर काही जण लंबोदर प‍ितांबर फळीवर वंदना असे म्हणतात. ते लंबोदर पितांबर फणीवरबंध‍ना असे आहे. लंबोदर म्हणजे मोठे पोट पिवळे पितांबर धारण केलेला. फणीवर म्हणजे नागांच्या विळख्याचा शेला कमरेला बांधलेला श‍िवशंकरांचा पुत्र असा त्याचा अर्थ आहे.

मराठी भाषा आपण जशी वळवू तशी वळते म्हणून तिच्या शब्दांचा वापर जपून करावा म्हणजे भावार्थ बदलत नाही. मराठी भाषेमध्ये अनेक संस्कृत शब्द आहेत. ते उच्चारतांना अवघड असतात. शिवाय सामान्य माणूस नेहमीच्या व्यवहारातील शब्दांना ग्राहय धरुन चालतो. त्यामुळे शब्दांचा अपभ्रंश होतो आणि अर्थ बदतो. मात्र बदलेला अर्थ कालांतराने रुढ होतो. मग याला नेमके काय म्हणावे हा प्रश्न निर्माण होते. अनेक श्लोक आणि आरत्यांमध्ये असंख्या चुका आहेत. शिवाय मराठी भाषा ही दर बारा कोसांवर बदलते त्यामुळे त्या प्रदशातला अर्थ देखील काव्यांमध्ये अभ‍िप्रेत होतो.

काही जण आरती बोलतांना पुस्तकाचा वापर करतात. तरी देखील चुकीचे उच्चार करतात. तर काही जण आरती ऐकून देखील चुकीचे उच्चार करतात. तर काही पुस्तकांमध्ये आरतीच चुकीची छापलेली असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी