29 C
Mumbai
Saturday, September 2, 2023
घरमहाराष्ट्रजालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद! पहा कुठे काय झालं?

जालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद! पहा कुठे काय झालं?

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी भीषण लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जनंतर एकाच खळबळ उडाली आहे. याबाबतचा विडिओ समाजमध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी यांचे पडसाद उमटत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाळी सराटी या गावात सादर घटना घडली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून उपोषण केले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी हे उपोषण करण्यात आले होते. परंतु, पोलिसांनी आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात घुसून आंदोलयांकर्त्यांवर बेछूट लाठीचार्ज केला. यावेळी, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे आरोप पोलिसांनी केले आहेत. तसेच आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी हवेत गोळीबार करून शांतिपूर्वक आंदोलन चिरडले.

या घटनेनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी ह्याचे पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी या घटनेविरोधात बंद पुकारण्यात आला असून काही ठिकाणी आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे.

अहमदनगर, नंदुरबार, सोलापूर येथे बससेवा बंद
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज राज्यातील अनेक भागात खबरदारीच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील जवळपास 630 बसेस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यातील काही भागातील बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोलापुरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून आज सकाळपासून सोलापूर विभागातील मराठवाडाकडे जाणाऱ्या 54 फेऱ्या रद्द केल्या आहेत.

सोलापूर बार्शीत टायर जाळून निषेध
संतप्त आंदोलनकर्त्यांनी सोलापूर, बार्शी येथे रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला. गंगापूर-लासूर स्टेशन येथे टायर जाळून रास्ता रोको करण्यात आलं. बुलढाण्यातील देऊळगावमध्ये रास्ता रोको करण्यात आला. तर मराठा समाजाद्वारे नवी मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आले.

बीड, परभणी, लातूर येथे कडकडीत बंद
जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे लातूर, परभणी येथेही बंद पुकारण्यात आला असून बाजारपेठा पूर्णपणे बांड ठेवण्यात आल्या आहेत.

यवतमाळमध्ये फडणविसांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
यवतमाळमधील बसस्थानक चौक येथे मराठा समाजाच्यावतीने रास्ता सोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर प्रकार थांबवला.

हिंगोली जिल्ह्यात ४ सप्टेंबरला बंद
हिंगोलीत मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने जाळण्यातील घटनेचा निषेध करण्यात आला. असून ४ सप्टेंबरला हिंगोली बंद पुकारण्यात येणार आहे.

हे ही वाचा 

सरंजामी मराठा नेतृत्वाचा आरक्षणाला विरोध असल्याने लाठीचार्ज; वंचितचा आरोप

एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्यावा; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

राज ठाकरेंनी मराठा आंदोनलावरुन राज्याच्या कारभाऱ्यांना सुनावले; म्हणाले….

अंतरवली घटनेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकारबाबत चौकशीचे आदेश दिले असून यांची माहिती त्यांनी ट्विटर वरुन दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी