34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रPune News : गजा मारणे टोळीला मोठा धक्का; फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Pune News : गजा मारणे टोळीला मोठा धक्का; फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहे. या अटक कारवाईमुळे गज्या मारणे टोळीला चांगलाच धक्का बसला आहे.

पुण्याच्या गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या टोळीतील फरार आरोपी रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदाराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या पथकाकडून सदर कारवाई करण्यात आली आहे. रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहे. या अटक कारवाईमुळे गजा मारणे टोळीला चांगलाच धक्का बसला आहे. पुण्यात बोकाळलेल्या गुंडप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांसह संपुर्ण पोलीस दलच कामाला लागले आहेत  पुण्यातील गुन्हेगारी जगताला धक्का देत पुणे पोलीसांनी ही मोहीम सुरूच ठेवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी फरार गुंड रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या गुंडांना शह देण्यात पोलिसांना अखेर यश मिळाले. शेअर बाजारात गुंतवलेल्या 4 कोटींच्या बदल्यात रुपेशने 20 कोटींची मागणी करून शेअर दलालाचे अपहरण केले. अपहरण करून त्या दलालाला मारहाण सुद्धा करण्यात आली त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने लक्षात घेत पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गज्या मारणेसह 15 जणांवर मोक्का कारवाई केली.

हे सुद्धा वाचा…

Mumbai News : मुंबई पुन्हा हाय अलर्टवर; हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट

Maharashtra News : शिंदे सरकारच्या काळात निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे फावले; पुन्हा सेवेत रुजू

Mumbai News : सीताराम कुंटे अन् इक्बाल चहल यांना न्यायालयाचे समन्स; कोरोना लसीकरणात भेदभावाचा आरोप

या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली परंतु त्यावेळी त्याच्याच टोळीतील रुपेश मारणे आणि काही साथीदार फरार झाले होते. या फरार आरोपींवर कारवाई करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेकडून कसून तपास करण्यात येत होता. दुसऱ्या प्रकरणात सुद्धा बांधकाम व्यावसायासाठी व्यावसायिकाने 1 कोटी 85 लाख रुपये व्याजाने घेतले, परंतु त्या व्याजाच्या बदल्यात 2 कोटी 30 लाख रुपये परत सुद्धा केले तरी सुद्धा 65 लाखांची मागणी करुन त्या व्यावसायिकाला धमकावले.

या प्रकरणी सुद्धा रुपेश मारणेसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला होता, परंतु रुपेश मात्र हाती लागत नव्हता. अखेर पुणे गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली असून रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. मारणे गॅंगला आळा घालण्याच्या प्रयत्नांना पुणे पोलिसांना चांगलेच यश आले असून त्यांच्या या मोठ्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी